25 November 2024 9:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

त्यांचा पचका वर्षभरापूर्वी झाला | ते दु:ख विसरायलाच सध्या ते बिहारमध्ये असतात – शिवसेना

Shivsena, Saamana Editorial, MP Sanjay Raut

मुंबई, १८ नोव्हेंबर: महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला नव्हता असे महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले आहेत. त्यांचा पचका आजपासून वर्षभरापूर्वी झाला व ते दुःख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारला असतात, असे म्हणत शिवसेनेनं भाजपला जोरदार टोला लगावला आहे. महाराष्ट्रातही सगळय़ात मोठा पक्ष विरोधात बसला आहे. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

आजच्या सामनाच्या अग्रलेखात नमूद केलं आहे. बिहारचे सरकार संपूर्ण पाच वर्षे टिकेल असा आत्मविश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला, त्याच वेळी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर असून ते फार काळ चालणार नाही अशी खदखद व्यक्त करीत आहेत. या ढोंगास काय म्हणावे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

बिहारमध्ये दिल्या घेतल्या शब्दास जागून भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद बहाल केले. या मेहेरबानीच्या ओझ्याखाली पुढचे दिवस ढकलावे लागतील. या चिंतेने नितीश कुमारांच्या चेहऱ्यावरचे तेज उडाले आहे. नितीश कुमार सलग सातवेळा अशाच तडजोडी करून मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, भाजपातर्फे देवेंद्र फडणवीस यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदासाठी शब्द दिला होता, असे सांगितले. मात्र महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द दिला नव्हता असे फडणवीसांचे पंटर पचकले आहेत. त्यांचा पचका आजपासून वर्षभरापूर्वी झाला व ते दु:ख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारमध्ये असतात, असा चिमटाही सामनामधून काढण्यात आला आहे.

 

News English Summary: In Maharashtra, the punters of Fadnavis in Maharashtra have digested that Shiv Sena was not given a word about the post of Chief Minister. The Shiv Sena has slammed the BJP, saying that the leaders of Maharashtra are currently in Bihar to forget their grief. In Maharashtra too, the largest party is in opposition. The same was reflected in Bihar, but we are happy that the Leader of the Opposition in Maharashtra is being credited for the victory in Bihar, the Shiv Sena said.

News English Title: Shivsena criticized BJP leaders through Saamana Editorial news updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x