8 September 2024 10:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

भाजपला केवळ मुंबईतल्या आर्थिक उलाढाल, शेअर बाजारात आणि जमिनींत रस | शिवसेनेचं प्रतिउत्तर

Mumbai Municipal Corporation Election 2022, BMC Election 2022, BJP, Shivsena

मुंबई, २० नोव्हेंबर: मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ (Mumbai Municipal Corporation Election 2022) मध्ये होणार असून मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकवण्याचा निर्धार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (State Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी बोलून दाखवल्यानंतर त्यावर महाविकास आघाडीतील पक्षांकडून देखील तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या या निर्धाराची खिल्ली उडवली आहे तर काँग्रेसने देखील या निमित्ताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई जिंकण्याचा संकल्प जाहीर केला आहे. त्यादरम्यान, शिवसेनेवर सातत्याने हल्ले करणारे आमदार अतुल भातखळकर यांच्यावर महत्वाची जबाबदारी देखील सोपविण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जोरदार राजकीय हल्ले सुरु झाले आहेत.

कारण शिवसेनेने वेळ न दवडता भारतीय जनता पक्षाच्या निर्धाराची जोरदार खिल्ली उडवली आहे. ‘भारतीय जनता पक्षाला मुंबईतल्या आर्थिक उलाढालींमध्ये, येथल्या शेअर बाजारात, जमिनींत रस आहे. मुंबईला दिल्लीचं पायपुसणं बनवण्याचा त्यांचा इरादा आहे पण ते आम्ही होऊ देणार नाही’, असा जोरदार पलटवार करतानाच ‘तुमच्या १०० पिढ्या खाली उतरल्या तरी मुंबई महापालिकेवरून शिवरायांचा भगवा झेंडा कोणी खाली उतरवू शकत नाही’, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. या आव्हान-प्रतिआव्हानाच्या पार्श्वभूमीवर युती आघाडीच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.

 

News English Summary: Mumbai Municipal Corporation Election 2022 and the decision of the Bharatiya Janata Party (BJP) to throw saffron on Mumbai has been voiced by State Opposition Leader Devendra Fadnavis. The Shiv Sena has ridiculed the Bharatiya Janata Party’s decision, while the Congress has also clarified its position on the occasion.

News English Title: Mumbai Municipal Corporation Election 2022 BJP announced political war against Shivsena news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x