25 November 2024 3:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक | डिजीटलपद्धतीने होणार निवड

Digital voting, Congress national president election, AICC, Rahul Gandhi

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीतही (Bihar Assembly Election 2020) मोठी हार पत्करावी लागल्याने आता काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षाच्या निवडीचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेसचा आगामी अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा (Congress president Selection digitally) निर्णय घेण्यात आला आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं असून पक्षाचा अध्यक्ष डिजीटलपद्धतीनेच निवडला जाणार असल्याचंही अधोरेखित झालं आहे.

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवडणूक डिजिटल माध्यमाद्वारे पार पडणार असल्याचं पक्षाकडून घोषित करण्यात आलंय. त्यानंतर, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) च्या सदस्यांकडून डिजिटल आयडी कार्ड (Digital ID Card) उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. पक्षातील ‘सेंट्रल इलेक्शन अथॉरिटी’ मतदारांची यादी बनवण्याचं काम सुरू आहे. अथॉरिटीकडून स्टेट युनिटसकडे एआयसीसी प्रतिनिधींचा डिजिटल फोटो मागवण्यात आला आहे. जवळपास १५०० प्रतिनिधी या निवडणुकीत सहभागी होणार आहेत.

विरोधकांकडून राहुल गांधी यांच्यासाठी एका नव्या मंचाची तयारी केली जात असल्याचं म्हटलं जातंय. परंतु, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राहुल यांच्याऐवजी इतर कुणी उभं राहीलं तर उत्सुकता नक्कीच ताणली जाईल.

या निवडणुकीत राहुल गांधी विजयी झाल्यास तेच पक्षाचे निर्विवाद नेते असून सर्वात लोकप्रिय नेते असल्यावरही शिक्कामोर्तब होणार आहे. परंतु, अध्यक्षपदाचे दावेदार वाढल्यास सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीला पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, राहुल गांधी हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

 

News English Summary: With the defeat in the Bihar Assembly Election 2020 (Bihar Assembly Election 2020), the winds of the party president’s election are blowing in the Congress. It has been decided to elect the next Congress president digitally. Therefore, it has become clear that the election for the post of Congress president will be held and it has also been underlined that the party president will be elected digitally.

News English Title: Digital voting in congress national president election AICC News updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x