मुंबई महापालिका निवडणूक | आ. भातखळकरांवर जवाबदारी | तर आ. शेलार यांचा राजकीय..?
मुंबई, 20 नोव्हेंबर: मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ (Mumbai Municipal Corporation Election 2022) मध्ये होणार असून मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकवण्याचा निर्धार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (State Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी बोलून दाखवला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई जिंकण्याचा संकल्प जाहीर केला आहे. त्यादरम्यान, शिवसेनेवर सातत्याने हल्ले करणारे आमदार अतुल भातखळकर यांच्यावर महत्वाची जबाबदारी देखील सोपविण्यात आली आहे. मात्र फडणवीसांनी आमदार अतुल भातखळकर यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची जवाबदारी देताना मुंबईतील भाजपचे महत्वाचे आमदार आशिष शेलार यांचा राजकीय गेम केल्याची चर्चा रंगली आहे.
२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलारांच्या खांद्यावर होती. त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं शिवसेनेसमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेनं ८४, तर भारतीय जनता पक्षानं देखील तब्बल ८२ जागा जिंकल्या होत्या. विशेष म्हणजे त्याआधीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या केवळ ३१ जागा होत्या. शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्षानं अतिशय घवघवीत यश मिळवलं. परंतु इतर नेत्यांना मोठं होऊ न देण्याची फडणवीसांची एकूण राजकीय शैली भाजपमधील चर्चेचा विषय बनली आहे.
कारण २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीटाबाबत शाश्वती नसल्याने अतुल भातखळकर थेट कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या दारी मनसेकडून निवडणूक लढविण्याची चाचपणी करण्यास पोहोचले होते. त्यानंतर विषय नितीन गडकरींकडे पोहोचला होता आणि त्यानंतर त्यांना उमदेवार मिळाल्याचं समोर आलं. भाजपकडून निवडून येण्याची अतुल भातखळकरांना देखील खात्री नव्हती. मात्र मोदी लाटेत त्यांची देखील लॉटरी लागली आणि ती २०१९ मधील निवडणुकीत देखील कायम राहिली. त्याच आमदार अतुल भातखळकरांवर थेट मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची जवाबदारी देत आशिष शेलार यांना ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि आशिष शेलार यांचा राजकीय गेम केल्याची चर्चा सुरु झाली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रभारीपदी आमदार अतुल भातखळकर यांची नेमणूक करण्यात आली. या बैठकीला शेलार अनुपस्थित होते.
मात्र आज शरद पवारांच्या उपस्थितीत घडलेल्या एका घटनेने आमदार आशिष शेलार यांनी जे विधान केलं आहे, त्याने त्यांची तीव्र नाराजी समोर आली आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला भाजप नेते आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी बोलताना शेलारांनी मराठा समाजातल्या स्त्रियांच्या कर्तृत्त्वावर भाष्य केलं. ‘मोठ्या पदावर मोठ्या मनाच्या व्यक्ती फार कमी असतात. ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ पुस्तकात शरद पवारांच्या आई शारदाबाई यांच्याबद्दल जे लिहिलंय, ते अतिशय प्रेरणादायी आहे. मराठा समाजातली कर्तृत्ववान स्त्री मुख्यमंत्री व्हावी, असं मला वाटतं. तसं होणार असेल, तर त्याला माझं समर्थन आहे,’ असं शेलार म्हणाले.
आशिष शेलार यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेलार यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अनेकांनी शेलार यांच्या विधानाचा संदर्भ भाजपमध्ये सुरू असलेल्या ताज्या घडामोडींशी जोडला आहे. त्यामुळे फडणवीस महाराष्ट्रात स्वतःपेक्षा कोणत्याही भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला मोठं होऊ देत अशी चर्चा भाजपच्या गोटात रंगल्या आहेत. यापूर्वी अनेक मोठ्या नेत्यांच्या बाबतीत सुरुवातीला असाच घटनाक्रम घडला होता आणि नंतर ते बाजूला सारले गेले होते.
News English Summary: The statement made by MLA Ashish Shelar in an incident that took place in the presence of Sharad Pawar has expressed his displeasure. Veteran journalist Vijay Chormare’s book ‘Kartratvavan Maratha Striya’ was published by Sharad Pawar. BJP leader Ashish Shelar was present on the occasion. Speaking on the occasion, Shelar commented on the achievements of women in the Maratha community. ‘There are very few big-minded people in a big position. What is written about Sharad Pawar’s mother Shardabai in the book ‘Kartuttvavan Maratha Striya’ is very inspiring. I think a capable woman from the Maratha community should be the Chief Minister. If that happens then I support him, “said MLA Ashsish Shelar.
News English Title: Political game of MLA Ashish Shelar over subject of Mumbai Municipal Corporation Election 2022 news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार