भाजपला कंटाळून लोकं काँग्रेसला मतदान करतात | मग काँग्रेसचे आमदार भाजपचं सरकार स्थापन करतात
दिल्ली, २१ नोव्हेंबर: नुकतेच बिहारमधील निवडणुकांचे निकाल जाहीर (Bihar Assembly Election 2020 Result) झाले. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार बिहारमध्ये स्थापन करण्यात आलं. निवडणुकीत महाआघाडीत काँग्रेसची कामगिरी ही निराशाजनक होती. काँग्रेसनं ७० जागांवर निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यांना केवळ १९ जागांवरच विजय मिळाला. दरम्यान, एकंदरीत परिस्थितीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “काँग्रेसची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. असं वाटतंय की आता काँग्रेसचं कोणी आई-बाप शिल्लक नाही. ज्याप्रकारे ते कामगिरी करत आहेत त्यावरून काँग्रेस आता देशाचं भविष्य नाही असं वाटत आहे,” असं केजरीवाल म्हणाले.
शुक्रवारी केजरीवाल यांनी हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समिट २०२० मध्ये सहभाग घेतला होता. “काँग्रेसचे पूर्णपणे अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. काँग्रेसचा कोणी आईबाप आता शिल्लक नाही. राज्या राज्यात लोकं भारतीय जनता पक्षाला कंटाळून काँग्रेसला मतदान करतात आणि नंतर काँग्रेसचं भाजपाचं सरकार स्थापन करून देतं,” असं म्हणत केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. “काँग्रेसचे सर्व आमदार भारतीय जनता पक्षात सामील होतात. तुम्ही मतं काँग्रेसला द्या किंवा भारतीय जनता पक्षाला, सरकार तर भारतीय जनता पक्षाचंच बनतं,” असंही ते म्हणाले.
दरम्यान, कोरोनाची लस (Corona Vaccine) देताना सामान्य आणि व्हीआयपी असा भेदभाव केला जाऊ नये, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मांडले आहे. केजरीवाल म्हणाले की सर्वांचाच जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळे कोरोनाची लस देताना सामान्य आणि व्हीआयपी असा भेदभाव केला जाऊ नये. कोरोनाची लस देताना कोरोना योद्ध्यांना प्राधान्य द्यायला हवे. त्यांच्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना प्राधान्य द्यायला हवे.
केजरीवाल म्हणाले की, कोरोनावरील लशीचं वितरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून योजना तयार केली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकार मात्र राजकीय विचार न करता तांत्रिकदृष्ट्या आणि प्राथमिकतेच्या आधारावर कोरोनावरील लशीचं वितरण करण्यास प्राधान्य देईल.
News English Summary: On Friday, Kejriwal had attended the Hindustan Times Leadership Summit 2020. The Congress is on a downward spiral. Congress has no parents left. In the states, people get fed up with the Bharatiya Janata Party and vote for the Congress and then the Congress forms the BJP government, said Kejriwal. All Congress MLAs join the Bharatiya Janata Party. “Whether you vote for the Congress or the Bharatiya Janata Party, the government is the Bharatiya Janata Party,” he said.
News English Title: Delhi Chief Minister Arvind Kejriwal slams congress party over Bihar Election Results news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल