20 April 2025 9:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

लव्ह जिहाद हा भाजपचा अजेंडा | लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे - महापौर

Mumbai Mayor, Kishori Pednekar, Love Jihad, BJP

मुंबई, २१ नोव्हेंबर: उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने, या पार्श्वभूमीवर लवकरच लव्ह जिहाद विरोधात कठोर कायद्याची निर्मिती केली असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. त्यानंतर हरियाणा व कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मध्यप्रदेश सरकारदेखील आता लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीतील भाजप मधील नेतेमंडळी हा कायदा राज्यात आणावा यासाठी पुढे आले आहेत.

मात्र मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात एक वक्तव्य केलं आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांसंदर्भात भाष्य केले. लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या, “लव्ह जिहाद हा केवळ भाजपाचा अजेंडा आहे. भाजपा या मुद्द्यावरून केवळ शब्दांचा खेळ करताना दिसत आहे. लव्ह जिहाद कुठे झालाय? हे आम्ही भाजपाला नक्कीच दाखवून देऊ. पण लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. भाजपा नेते मात्र यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे”, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.

दुसरीकडे याच विषयाला अनुसरून फडणवीस म्हणाले की, देशात ‘लव्ह जिहाद’ च्या घटना घडत आहेत, त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी कायदा आणणे आवश्यक आहे. ते कॉंग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या आरोपासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देत होते. गेहलोत यांनी भाजपवर लव्ह जिहाद हा शब्द तयार करण्याचा आणि जातीय सलोखा बिघडविण्याचा आरोप केला होता. यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, ‘हे सर्व ढोंगी धर्मनिरपेक्ष लोक आहेत. हिंदूंवर हल्ले करणे आणि त्यांना शिव्या देणे म्हणजे धर्मनिरपेक्षता, असे त्यांचे मत आहे.’

ते म्हणाले, “देशात लव्ह जिहाद चालू आहे आणि केरळमध्येही भाजपाची सत्ता नसतानाही हे स्वीकारले गेले आहे.” फडणवीस पुढे, “जेव्हा अशा गोष्टी उद्भवतात तेव्हा कायदे करणे ही सरकारची जबाबदारी बनते.” काही भाजपा शासित राज्यांनी तथाकथित लव्ह जिहाद रोखण्यासाठी योजना आखल्या आहेत.

 

News English Summary: Mayor Kishori Pednekar spoke to the media in Mumbai on Saturday. This time he commented on various issues. Speaking on the issue of anti-love jihad law, she said, “Love jihad is only the agenda of the BJP. The BJP seems to be playing with words on this issue. Where did the love jihad take place? We will definitely show this to the BJP. But marriage is a favorite pastime of boys and girls. However, the BJP leader is only trying to do politics based on this, ”alleged Kishori Pednekar.

News English Title: Mumbai Mayor Kishori Pednekar reply on Law Against Love Jihad News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या