यूपीत खळबळ | मथुरेतील आश्रमात २ हिंदू साधूंचे मृतदेह आढळले | विष प्रयोगाचा आरोप
मथुरा, २१ नोव्हेंबर: योगी सरकारच्या राज्यात एक खळबळ माजविणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशात योगिता सरकार हिंदुत्वाच्या अनेक गप्पा मारताना देशाने पाहिलं आहे. भाजपाची सत्ता नसलेल्या इतर राज्यांना भाजपचे नेते हिंदुत्वावरून नेहमीच लक्ष करत असतात. तसेच हिंदुत्वाच्या मुद्यावरून इतर राजकीय पक्षांना नेहमीच लक्ष करत असतात. मात्र स्वतःची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये हिंदुत्वाशी संबंधित घटना घडल्यानंतर भाजपचे नेते शांत असतात हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. आता पुन्हा तशीच घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.
कारण यूपीतल्या मथुरेतील गोवर्धनमधील जंगलात असलेल्या आश्रमात दोन साधूंचे मृतदेह आढळून आले आहेत. या साधूंच्या मृत्यूबद्दल मोठा संशय व्यक्त केला जात आहे. साधूंच्या मृत्यूची खळबळजनक माहिती समजताच परिसरात अनेकांना धक्का बसला. त्यानंतर डीएम, एसएसपीसह पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी देखील पाठवले आहेत.
#BREAKING – यूपीत खळबळ | मथुरेतील आश्रमात २ हिंदू साधूंचे मृतदेह आढळले | विष प्रयोगाचा आरोप. pic.twitter.com/dVrwtxINue
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) November 21, 2020
त्यातील एका साधूंची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. आश्रमात असलेल्या गायीच्या दूधापासून चहा प्यायल्यानंतर ही घटना घडल्याचं वृत्त आहे. त्यामुळे विष प्रयोग करून हत्या करण्यात आल्याचा आरोप एका साधूंच्या भावानं केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवर्धनच्या गिरीराज बागेच्या मागे तीन साधू एका वर्षापासून आश्रम तयार करून राहत होते. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास दोन साधूंच्या मृत्यूची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे एकच खळबळ माजली.
गोपाल दास आणि श्याम सुंदर दास अशी मृत्यूमूखी पडलेल्या दोन साधूंची नावं आहेत. तर रामबाबू दास यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विष देऊन साधूंची हत्या करण्यात आल्याचा आरोप गोपाल दास यांचे भाऊ टीकम यांनी केला. आश्रमातून विषारी औषधांचा वास येत असल्याचा दावादेखील त्यांनी केला. या प्रकरणात चित्रीकरण करण्यात येईल अशी माहिती एसएसपींनी दिली.
News English Summary: The bodies of two sadhus have been found in a forest ashram in Govardhan, Mathura, Uttar Pradesh. There is great suspicion about the death of these monks. Many in the area were shocked to hear the shocking news of the sadhu’s death. Police along with DM and SSP have reached the spot. Police have seized the bodies and sent them for autopsy.
News English Title: Suspected death two Saints Mathura Ashram Uttar Pradesh News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS