25 November 2024 6:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Netflix | A Suitable Boy | मंदिर परिसरातील चुंबन दृश्यावर भाजपचा आक्षेप

Netflix, A suitable boy, kissing scene, Outside Temple

मुंबई, २२ नोव्हेंबर: नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज अनेकदा वादात अडकल्या आहेत. नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मवरील वेबसीरीजमध्ये (Netflix Web series Platform) अनेकदा केवळ अश्लीलतेचं प्रदर्शन करण्यात येत असल्याचा आरोप यापूर्वी सुद्धा अनेकवेळा करण्यात आला आहे. दरम्यान आता नेटफ्लिक्सवरील एका दृश्यावरून धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून त्यात राजकीय पक्षाने आक्षेप घेतल्याने विषय अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर ‘अ सुटेबल बॉय’ ही वेब सीरिज (Netflix ‘A Suitable Boy’ web series) प्रदर्शित झाली होती. पण आता या सीरिजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेत लव्ह जिहादला (Love Jihad) पाठिंबा दिल्याचा आरोप केला जात आहे. ट्विटरवर हॅशटॅग बॉयकॉट नेटफ्लिक्स देखील ट्रेंड होत असल्याचे दिसत आहे.

‘अ सुटेबल बॉय’ ही वेब सीरिज भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरच्या काळावर आधारित असल्याचे दिसत आहे. या सीरिजमध्ये एक प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. लता मेहेरा आणि कबीर दुर्रानी ही दोन पात्रे मंदिराच्या परिसरात एकमेंकांना चुंबन करताना सीरिजमधील एका भागात दाखवण्यात आले आहे. या दृश्यांवर भारतीय जनता पक्षाचे गौरव तिवारी यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली आहे.

News English Summary: A few days ago, Netflix aired the web series ‘A Suitable Boy’. But now he is being accused of supporting Love Jihad by objecting to some scenes in the series. The hashtag Boycott Netflix also seems to be trending on Twitter.

News English Title: Netflix a suitable boy sparks communal row over kissing scene News updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x