24 November 2024 6:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार असल्याचं माहिती नव्हतं | त्यांचा हा गुण माहिती नव्हता - पवार

Sharad Pawar, BJP MP Raosaheb Danve, Astrologer, Jyotishshastra

बीड, २४ नोव्हेंबर: ठाण्यातील आमदार आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालय (ईडी)च्या टीमने छापा टाकला आहे. तसंच प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरी देखील छापा टाकण्यात आला आहे.

ठाण्यातील शिवसेनेचे मोठे नेते अशी ओळख असणाऱ्या प्रताप सरनाईक यांच्या घरी थेट छापेमारी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक यांच्या गेल्या काही वर्षांमधील व्यवहारांची तपासणी ईडीकडून करण्यात येणार आहे. तसेच काही कागदपत्रांची देखील पुर्नपडताळणी केली जात आहे.

दरम्यान शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

तत्पूर्वी पुढच्या दोन ते तीन महिन्यात भाजपचं सरकार येईल, असा दावा करणाऱ्या भाजप नेते रावसाहेब दानवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारले आहे. दानवे हे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे मला माहिती नव्हतं, असा टोला लगावत पवारांनी दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ‘रावसाहेब दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत, हे मला माहिती नव्हतं. दानवे खासदार असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते राजकारणात आहेत. पण त्यांचा हा गुण माहिती नव्हता. राजकारणात कधीही त्यांना ज्योतिषी म्हणून ओळख मिळालेली नाही, पण त्यांच्यात हे कौशल्य आहे हे मला आज कळालं,’ असा मिश्किल टोला शरद पवारांनी लगावला आहे.

 

News English Summary: I did not know that Danve is an expert in astrology, Pawar has taken the news of Danve’s statement. ‘I did not know that BJP MP Raosaheb Danve is an expert in astrology. Danve is an MP and has been in politics for the last several years. But he did not know this quality. He has never been known as an astrologer in politics, but today I have come to know that he has this skill, ‘said Sharad Pawar.

News English Title: Sharad Pawar slams BJP MP Raosaheb Danve over his statement like astrologer news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x