22 November 2024 6:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कार्यकर्ते आणि आमदार सोबत राहावेत | म्हणून सरकार पडण्याचं गाजर दाखवावं लागतं - उपमुख्यमंत्री

Deputy CM Ajit Pawar, BJP leaders, MahaVikasAghadi

कराड, २५ नोव्हेंबर: राज्य सरकार पडणार आहे हे प्रमुख विरोधी पक्षांना वारंवार बोलावच लागतं. 1995 ते 99च्या काळात आम्ही एकूण 80 जण आमदार म्हणून निवडून गेलेले होतो. कार्यकर्तेबरोबर राहण्याकरिता आणि आमदारांमध्ये चलबिचल राहू नये, यासाठी सारखं गाजर दाखवायचं काम करायचं असतं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार पलटवार केला आहे. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झालं की नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे महाविकास आघाडीच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. ते मजबुतीनं उभे आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही हे मी स्पष्टपणे सांगू शकतो, असंही अजित पवारांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे.

त्यासंदर्भात शरद पवारांनी काल जयसिंगराव गायकवाडांच्या पक्ष प्रवेशात सरकार पडणार नसल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यावर मी जास्त बोलणं योग्य दिसत नाही. शरद पवार आमचं सर्वांचं दैवत आहे आणि त्यांनी भूमिका स्पष्ट केलेलं आहे, असंसुद्धा अजित पवार म्हणाले आहेत. ते 105 लोकं असताना त्यांना सरकारमध्ये कामाची संधी मिळालेली नाही हे त्यांचं खरं दुखणं आहे. त्यामुळेच सारखं काही ना काही कांड्या पेटवायचं काम त्यांचं सुरू आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

 

News English Summary: Opposition parties have repeatedly said that the government will fall. Between 1995 and 1999, 80 of us were elected as MLAs. Deputy Chief Minister Ajit Pawar has retaliated against the BJP, saying that it is necessary to work like a carrot to stay with the party workers and not to be fickle among the MLAs. Deputy Chief Minister Ajit Pawar has gone to Karad on the occasion of Yashwantrao Chavan’s death anniversary. He was talking to the media at the time.

News English Title: Deputy CM Ajit Pawar criticized BJP leaders over statement on MahaVikasAghadi news updates.

हॅशटॅग्स

#AjitPawar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x