फडणवीसांचा दावा खोटा | केंद्राच्या आकडेवारीनुसार गुंतवणुकीत महाराष्ट्र पिछडीवर होता
मुंबई, २५ नोव्हेंबर: मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली असं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं,” असंही ते म्हणाले आहेत. “आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. जनतेला सारे काही समजते. शिवसेना म्हणजे महाराष्ट्र असा समज त्यांनी करून घेऊ नये,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मात्र केंद्र सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार फडणवीसांचा दावा चुकीचा असल्याचं स्पष्ट होतं. म्हणजे गुंतवणुकीच्या बाबतीत अगदी दिल्लीने देखील महाराष्ट्राला मागे टाकलं होतं.
आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणले. आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. जनतेला सारे काही समजते.
शिवाय, शिवसेना म्हणजे महाराष्ट्र असा समज त्यांनी करून घेऊ नये: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 25, 2020
थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) प्राप्त करण्यात चालू आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत नवी दिल्ली आणि एनसीआरने महाराष्ट्राला मागे टाकून अग्रस्थान पटकावले होते. केंद्र सरकारच्या ‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन अँड इण्डस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड’ अर्थात ‘डीआयपीपी’च्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०१८-१९च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये दिल्ली आणि एनसीआरमध्ये ५७,३३३ कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली होती.
त्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या (२०१८-१९) पहिल्या नऊ महिन्यांमध्ये (एप्रिल ते डिसेंबर २०१८) या कालावधीत ‘एफडीआय’च्या बाबतीत दिल्ली-एनसीआर आणि महाराष्ट्रानंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि गुजरातचा क्रमांक लागतो. आर्थिक वर्ष २०१६-१७च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक प्राप्त करण्याचा मान मात्र महाराष्ट्राने पटकावला होता. या कालावधीत देशीतील एकूण विदेशी गुंतवणुकीच्या ४९ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली होती. २०१७-१८च्या पहिल्या नऊ महिन्यांत महाराष्ट्रातील थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण घटून ३२ टक्क्यांवर आले. तर, २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात गुंतवणुकीत आणखी घट होऊन ती २४ टक्क्यांवर पोहोचली. एकीकडे महाराष्ट्रातील विदेशी गुंतवणूक घटत असतानाच दुसरीकडे मात्र नवी दिल्ली आणि एनसीआरमधील गुंतवणुकीत वाढ होत आहे. विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यातील १४ टक्क्यांवरून २०१७-१८च्या पहिल्या नऊ महिन्यात १७ टक्क्यांवर गेले आहे. २०१८-१९च्या पहिल्या नऊ महिन्यांतच विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढून २५ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे.
महाराष्ट्राप्रमाणेच तमिळनाडूतील थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाणही घटल्याचे दिसून आले होते. २०१७-१८च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये १८ टक्क्यांवर असणारे प्रमाण चार टक्क्यांनी घटून २०१८-१९मध्ये याच कालावधीत १४ टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून आले होते. आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये राज्यातील एकूण ‘एफडीआय’चे प्रमाण २१ टक्के असल्याचे आढळून आले होते.
दुसरीकडे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या ‘डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अॅण्ड प्रमोशन’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये कर्नाटकमध्ये १ लाख ५४ हजार १३१ कोटी, गुजरातेत ५३ हजार ६२१ कोटी तर महाराष्ट्रात ३८ हजार ०८४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले होते. सन २०१७च्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीमध्ये कर्नाटकात १ लाख ४७ हजार ६२५ कोटी रुपये, गुजरातमध्ये ६५ हजार ७४१ कोटी तर महाराष्ट्रात २५ हजार १८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले होते. देशातील गुंतवणुकीच्या तुलनेत २०१५ मध्ये महाराष्ट्रात १०.७ टक्के, २०१६ मध्ये ९.२८ टक्के तर २०१७ च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत केवळ ७.५३ टक्के इतकी गुंतवणूक आली होती. त्यामुळे त्यावर्षाच्या सप्टेंबपर्यंत राज्य तिसऱ्या क्रमांकावर घसरल्याचं आकडेवारी सांगत होती.
News English Summary: Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis has said that when I was the Chief Minister, Maharashtra progressed faster than Gujarat. “During our government, more investment came to Maharashtra than to Gujarat. We have brought Maharashtra to the forefront, ”he said. “We criticized that Maharashtra is not a traitor. The public understands everything. They should not assume that Shiv Sena is Maharashtra, ”he said. He was speaking at a press conference in Pune. However, according to the statistics released by the central government from time to time, it was clear that Fadnavis’ claim was wrong. In other words, even Delhi had overtaken Maharashtra in terms of investment.
News English Title: Devendra Fadnavis misinformation about investment in Maharashtra during his tenure news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार