22 November 2024 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

तुमचं ऑफिस तुमची जबाबदारी | मनसेचा महामोर्चा | वीजबिलावरून सरकारला शॉक

MNS Maha Morcha, High electricity bills,  Raj Thackeray, MahaVikas Aghadi

मुंबई, २६ नोव्हेंबर: वाढीव वीजबिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली (MNS party Protest against High Electricity Bills) असून आज (२६ नोव्हेंबर) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत असून राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली असून अटक केली आहे. तर काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिला आहे.

सर्वसामान्य नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज मोर्चाचं आयोजन केलं आहे. अनेक शहरांत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. वीज दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश महामोर्चाचं आयोजन (Maharashtra Navnirman Sena Jan Akrosh Morcha) केलंय. यासाठी मुंबईच्या विविध भागांतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याचं पाहायला मिळालं.

मुंबईत वांद्रे येथे बाळा नांदगावकर (MNS Leader Bala Nanadgainkar) यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला आहे. आंबेडकर गार्डनपर्यंत मोर्चा काढल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी सांगितलं की, “कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करायचं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा राज ठाकरेंचा सक्त आदेश आहे. कुठेही गोंधळ गडबड करायची नाही, तोडफोड करायची नाही”.

 

News English Summary: Maharashtra Navnirman Sena (MNS party has protested against high electricity bills) and today (November 26) there are agitations all over the state. Maharashtra soldiers have been seen attacking in many places including Mumbai, Pune, Nashik and Aurangabad and outrage is being expressed against the state government. In some places, the police have taken action against Maharashtra Navnirman Sena activists and arrested them. Some have been arrested. Meanwhile, party chief Raj Thackeray has given strict orders to the agitating Maharashtra soldiers.

News English Title: MNS Maha Morcha in whole state against high electricity bills news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x