19 April 2025 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

राष्ट्रवादीचे पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे निधन

NCP MLA Bharat Bhalke, passes away

मुंबई, २८ नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (२८ नोव्हेंबर) पंढरपुरातील सरकोली येथे अंत्यसंस्कार केले जातील. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसह दिग्गज नेत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

आमदार भारत भालके हे पंढरपूर मंगळवेढा इथून निवडून आले होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर संसर्गामुळे त्रास होत असल्याने त्यांना पुण्यात रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ‘पोस्ट कोविड त्रासांमुळे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली असल्याची आणि प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुबी हॉलचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतः डॉक्टरांच्या संपर्कात राहून आमदार भालकेंच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. पण अखेर डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि भालके यांची प्राणज्योत मालवली.

 

News English Summary: NCP’s Pandharpur-Mangalvedha assembly constituency MLA Bharat Bhalke passed away in Pune at midnight on Friday. His last rites will be performed today (November 28) at Sarkoli in Pandharpur. After the demise of Bharat Bhalke, there has been an outcry from veteran leaders, including the NCP. NCP leaders have tweeted condolences over his death.

News English Title: NCP MLA Bharat Bhalke passes away news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या