गृह राज्यमंत्री सेनेचे, तरी आश्वासन 'वसईतील गुंडगिरी मोडून काढू'?
वसई : सध्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असून दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यात कोणती सुद्धा कसर शिल्लक ठेवताना दिसत नाहीत. तसाच काहीसा प्रकार सेनेच्या प्रचारादरम्यान घडला आहे. कारण प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी वसईकरांना आश्वासन दिल की,’आम्ही वसईतील गुंडगिरी मोडून काढू’. विषय गमतीचा असा आहे की सध्या राज्यात भाजप-शिवसेनेच्या युतीच राज्य आहे. त्यात कायदा व सुव्यवस्था संबंधित मंत्रालय म्हणजे फडणवीस गृहमंत्री तर सेनेचे दीपक केसरकर हे राज्याचे गृह राज्यमंत्री आहेत.
विशेष म्हणजे सध्या लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु आहे आणि कायदा व सुव्यवस्था हा विषय खासदाराच्या अखत्यारीतला नाही. कायदा व सुव्यवस्था हा राज्याच्या गृहमंत्रालयाशी संबंधित विषय आहे. तसेच राज्याचं गृहमंत्री पद देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्याकडे आहे.
कालच्या सभेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी वसईकरांना आश्वासन दिलं की,’आम्ही वसईतील गुंडगिरी मोडून काढू’. उद्धव ठाकरेंच्या सभेतील रोख हा ठाकूर कुटुंबियांशी संबंधित होता. परंतु विषय हा आहे की, सत्तेत येऊन ४ वर्ष उलटली तरी वसई – विरारमधील ठाकूर कुटुंबीयांची गुंडगिरी संपविण्यासाठी किव्हा नियंत्रणात आणण्यासाठी शिवसेनेचे गृहराज्यमंत्री यांना ४ वर्ष कोणी रोखलं होत का ? असा प्रश्न स्थनिक करत आहेत.
वसई मध्ये सोडा इथे संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यस्थेची काय अवस्था आहे ते सर्वश्रुत आहे. किंबहुना राज्याला गृहमंत्री आहे की नाही असा प्रश्न सामान्य जनता उपस्थित करत होती. अगदी अलीकडेच घडलेली अहमदनगर मधील दुहेरी हत्याकांड घटना आणि तिथे काय परिस्थिती होती हे वेगळं सांगायला नको.
स्वतः उद्धव ठाकरे यांनीच सभेत मान्य केलं की वसई-विरारकडे आजवर दुर्लक्ष झालं आहे. परंतु आता वसईतील गुंडगिरी मोडून काढू. केवळ निवडणूका आल्या की कायदा आणि सुव्यवस्थेचे दाखले देत सुटायचे हे नित्याचाच असल्याचं स्थानिक नागरिक बोलत आहेत. दुर्दैव म्हणजे सत्ताधारी शिवसनेंकडेच राज्याचं गृह राज्यमंत्रीपद आहे, मग शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांना कोणी रोखलं होत का ४ वर्ष वसईतील ठाकूर कुटुंबीयांची गुंडगिरी मोडून काढण्यापासून ? असा प्रति प्रश्न वसईतील अनेक नागरिकांनी केला आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
- Post Office Schemes | दररोज 100 रुपये वाचवून पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा, मिळेल लाखो रुपयात परतावा
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- Railway Ticket Booking | 'पैसे न भरता' रेल्वे तिकीट बुक करा आणि बिनधास्त प्रवास करा, ही सुविधा 90% प्रवाशांना माहित नाही
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE