19 April 2025 1:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

नारायण राणे गंजलेली ताेफ | अशा तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं - जयंत पाटील

BJP state president Jayant Patil, BJP MP Narayan Rane

मुंबई, २८ नोव्हेंबर: राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोटस होणार असल्याचं असं भाकीत वर्तवणारे भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (NCP State President Jayant Patil criticized BJP MP Narayan Rane) अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसते, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवाराच्या प्रचारासाठी अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणेंवर सडकून टीका (Minister Jayant Patil slams MP Narayn Rane) केली. राणे वारंवार राज्य सरकारवर टीका करत असल्याने त्याबाबत पाटील यांना विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं, असं सांगत राणेंची खिल्ली उडवली. भारतीय जनता पक्ष नेहमीच वेगवेगळे स्टेटमेंट देऊन सरकार पडण्याच्या धमक्या देत असते. जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण त्यात त्यांना यश मिळत नाही. संभ्रम निर्माण करणं हा त्यांचा नेहमीचा धंदा आहे, असं सांगतानाच येत्या दोन महिन्यात आपलेच सरकार येणार असं ते हे सरकार आल्यापासून सांगत आहेत. आज आम्ही एक वर्षही पूर्ण केलंय. तरी त्यांचं तेच पालुपद सुरू आहे. त्यामुळे राणेंच्या टीकेला गंभीरपणे घेण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे (Mahavikas Aghadi candidate Shrikant Deshpande) यांच्या प्रचारार्थ अकाेल्यात शुक्रवारी घेतलेल्या सभेनंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. ते म्हणाले की राज्यात काेराेना आटाेक्यात आला आहे. अजून प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षावाले सरकार पाडण्याचे राेज मुहूर्त काढत आहेत. त्यांच्या मुहूर्तामध्येच आम्ही वर्षपूर्तीकडे वाटचाल केली आहे. सत्ता गेल्याचे दु:ख ते पचवू शकले नाही. त्यामुळे सरकारवर बेछुट आराेप करीत आहे. त्यांची सारी उठाठेव ही चर्चेत राहण्यासाठीच आहे. त्यांना विराेधी पक्षनेते पद किती गांभीर्याने घ्यावे लागते, याचा अनुभव नाही. त्यांनी अजून चार वर्ष ताे अनुभव घ्यावा, असा शेलक्या शब्दात त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

 

News English Summary: BJP state president Jayant Patil has slammed BJP leader Narayan Rane for predicting 100 per cent Lotus operation in the state. Jayant Patil has sharply criticized Narayan Rane saying that he does not want to answer the bullets coming from the rusty cannon.

News English Title: BJP state president Jayant Patil has criticized BJP leader Narayan Rane News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या