25 November 2024 7:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

बेकायदा बांधकाम पाडलं हा विषय राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा होतो का? - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut, Opposition leader Devendra Fadnavis

मुंबई, २८ नोव्हेंबर: कोर्टाच्या एका निकालावर राष्ट्रपती राजवट लागू होणार असेल तर त्यांनी तशी मागणी करुन नवीन पायंडा पाडावा, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे.

कंगना राणावत हिच्या कार्यालयावरील मुंबई महापालिकेची कारवाई बेकायदा ठरवत मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court decision on Kangana Ranaut office demolition case) बीएमसीवर ताशेरे ओढले आहे. तर, एकीकडे सुप्रीम कोर्टाने Republic TV’चे संपादक यांना जामीन न देणं ही चूक असल्याचं निरीक्षणं नोंदवले आहेत. या दोन निकालावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी सराकरवर निशाणा साधला असून आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारने सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला असल्याचा आरोपही केला. फडणवीसांच्या या आरोपांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मी असं ऐकलं की, मुख्यमंत्र्यांनी धमकीची भाषा वापरली. मला या विषयावर देवेंद्रजींना उत्तर देता आलं असतं. देवेंद्र जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांचं एक विधान ऑन रेकॉर्ड आहे, सगळ्यांच्या कुंडल्या मी घेऊन बसलोय. फडणवीस सरकारला विरोध करणाऱ्याच्या कुंडल्या माझ्या हातात आहे, असं ते म्हणाले होते. ही काय भाषा आहे. ही भयंकर धमकीची भाषा होती. यंत्रणा वापरुन तुम्हाला विरोध करणाऱ्यांच्या कुंडल्या जवळ ठेवत होते. असे अनेक विधानं आमच्या स्मरणात आहे, असे देखील खासदार राऊतांनी सांगितले.

 

News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut has urged Bharatiya Janata Party (BJP) leaders to lay a new foundation by demanding a court ruling if the President’s rule is to be implemented. The Mumbai High Court (Mumbai High Court decision on Kangana Ranaut’s office demolition case) has slammed BMC, declaring the Mumbai Municipal Corporation’s action against Kangana Ranaut’s office illegal.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut criticized opposition leader Devendra Fadnavis news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x