28 April 2025 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स मालामाल करणार; या अपडेटनंतर तेजीचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
x

विधानसभा, गिरीश बापटांना मनसेच्या रूपाली पाटलांच आवाहन

पुणे : मनसेच्या महिला आघाडी शहराध्यक्षा रूपाली पाटील-ठोंबरे यांना मनसेकडून कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या थेट भाजपच्या गिरीश बापटांना तसेच मनसेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या रवींद्र धंगेकरांना आवाहन देतील.

आगामी निवडणुकीत त्या मनसे सोडून गेलेल्या रवींद्र धंगेकरांना सुद्धा धडा शिकवतील असं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची नियुक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडी शहराध्यक्षपदी करण्यात आली असून त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रूपाली पाटील-ठोंबरे या पुण्यातील मनसेच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून सर्वश्रुत आहेत. त्यांच्या त्या आक्रमक स्वभावाचा फायदा पक्षाला होईल असं पक्ष नैतृत्वाला वाटतं त्यामुळेच त्यांना तशा सूचना देणार आल्या आहेत. कसबा मतदार संघातून पालकमंत्री गिरीश बापट हे विद्यमान आमदार आहेत असून ते गेली ५ वेळा येथे निवडून येत आहेत.

कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचं नाव आघाडीवर असून ते मनसेतून काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी मागील निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापटांना कडवी टक्कर दिली होती. भाजपचे गिरीश बापट आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील मत विभागणीचा फायदा मनसेच्या रूपाली पाटील-ठोंबरे यांना सुद्धा होऊ शकतो असं बोललं जात असलं तरी रूपाली पाटील-ठोंबरे या सुद्धा इथे कडवं आवाहन उभं करतील असं पक्षाच मत आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्यातील कसाब विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल सुद्धा पाहावयास मिळू शकतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या