29 April 2025 11:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांकडून चर्चेचं आवाहन | केंद्रासोबत चर्चा होणार

Agriculture Minister Narendra Tomar, Farmers associations, Amit Shah, Agriculture Bills

नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर: कृषी कायद्याविरोधात (Agriculture Bills) आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home minister Amit Shah) यांनी आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांच्या सर्व समस्या तसेच मागण्यांवर विचार करण्यासाठी मोदी सरकार तयार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. कृषीमंत्री नरेंद्र तोमर (Union Agriculture minister Narendra Tomar) यांनी शेतकऱ्यांना ३ डिसेंबर या दिवशी शेतकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

“पंजाब सीमेपासून दिल्ली-हरियाणा सीमेवर विविध शेतकरी संघटनेच्या (Farmers associations) आवाहनानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आंदोलक शेतकऱ्यांना 3 डिसेंबरला चर्चेसाठी बोलावलं आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सर्व समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तयार आहे”, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर शेतकरी बांधव आपले ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एवढ्या थंडीत उघड्यावर बसले आहेत. या सर्वांना मी आवाहन करतो, की दिल्ली पोलीस आपणा सर्वांना एका मोठ्या मैदानावर स्थलांतरित करण्यास तयार आहेत. जेथे आपल्याला सुरक्षा व्यवस्था आणि सुविधा मिळतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

 

News English Summary: Union Home Minister Amit Shah has assured the farmers protesting against the Agriculture Bills. Union Home Minister Amit Shah said that the Modi government was ready to consider all the problems and demands of the farmers. Union Agriculture Minister Narendra Tomar has invited the farmers for a discussion on December 3.

News English Title: Agriculture Minister Narendra Tomar has invited farmers associations on December 3 for discussion news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AmitShah(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या