23 November 2024 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

महाविकास आघाडी सरकार बैलासारखं | सतत टोचल्याशिवाय पुढेच जात नाही - गडकरी

Union Minister Nitin Gadkari, MahaVikas Aghadi government

नागपूर, ३० नोव्हेंबर: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. तसं केल्याशिवाय ते पुढेच सरकत नाही, असं टीकास्त्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी सोडलं आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी (BJP Nagpur Graduate constituency candidate Sudhir Joshi) यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात नितीन गडकरी संबोधित करत होते.

पुढे गडकरी म्हणाले की, निवडणुकीत जातीपातीचं राडकारण व्हायला नको, असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलं. ‘कोणताही माणूस जातीनं मोठा होत नसतो, तर कर्तृत्वाने मोठा असतो. निवडणूक आली की अमक्या जातीचा आहे म्हणून उमेदवारी मागितली जाते. निरनिराळ्या राजकीय पक्षांमध्ये जातीनिहाय आघाड्या आहेत. त्या बंद झाल्या पाहिजे. कार्यकर्त्यांत जात नसते. मात्र ज्यांना उमेदवारी पाहिजे असते, त्यांना जात आठवते. मात्र राज्यातील आघाडी सरकार व केंद्रातील विरोधक जातीचं राजकारण करत आहेत. त्यांना धडा शिकवायला हवा,’ असं गडकरी म्हणाले.

दुसरीकडे फडणवीसांनी (Opposition Leader Devendra Fadnavis) देखील राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज्यातील बळीराजाला दिलेले आश्वासन लक्षात नाही. परंतु मुख्यमंत्रिपदाचे वचन त्यांच्या बरोबर ध्यानात आहे. महाविकास आघाडी सरकार आहे की तमाशा? ओबीसी विद्यार्थ्यांना जगात चांगल्या ठिकाणी शिक्षण घेता यावे म्हणून योजना आणली, परंतु हे महाविकास आघाडी सरकार काय करतेय तेच समजत नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले. मात्र या सरकारमधील मंत्री वेगवेगळ्या भूमिका मांडून नवे वाद निर्माण करतात, असेही फडणवीस म्हणाले.

 

News English Summary: The Maha Vikas Aghadi government in Maharashtra is like a bull. This government has to keep on pushing. Without doing so, it will not move forward, said Union Minister for Land Transport Nitin Gadkari. Nitin Gadkari was addressing a graduation rally organized for the campaign of Sandeep Joshi, the official candidate of Bharatiya Janata Party from Nagpur graduate constituency.

News English Title: Union Minister Nitin Gadkari criticized MahaVikas Aghadi government news updates.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x