22 November 2024 6:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

BHR Scam | खडसेंकडून गैरव्यवहारांची कागदपत्रे सादर | बड्या व्यक्तींचा नामोल्लेख टाळला

NCP leader Eknath Khadse, BHR Society scam, Girish Mahajan, Sunil Zanvar

जळगाव, १ डिसेंबर: बीएचआर पतसंस्था (BHR Society) अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीशी संबंधित कागदपत्रांनुसार जळगाव शहरातील खान्देश कॉप्लेक्सचा पत्ता असलेल्या श्री. साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ही कंपनी सूरज सुनील झंवर व कैलास रामप्रसाद सोमाणी (Sunil Zanvar and Kailas Ramprasad Somani) यांच्या मालकीची आहे, असे एनसीपीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. दरम्यान, बीएचआर घोटाळा प्रकरणी सूरज यांचे वडील सुनील झंवर यांच्या ठिकाणांवर आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकलेले आहेत. झंवर हे हे जळगावातील मोठे व्यावसायिक आहेत.

एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांनी पत्रकार परिषदेत या घोटाळ्याबाबत अनेक दावे केले. गैरव्यवहार करणाऱ्या अनेकांनी कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता अगदी कवडीमोल भावात खरेदी केल्या. त्यामुळे ठेवीदारांना खूप मोठा फटका बसला आहे, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला. जळगाव जिल्ह्यातील जामनेरसह पुण्यातील निगडी येथील काही जमिनी अशाप्रकारे घेण्यात आल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात आळा आहे. आता या गैरव्यवहाराची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असल्याने मी आणखी कोणतीही माहिती जाहीर करू शकत नाही. मला काही मर्यादा आहेत, असे सांगत एकनाथ खडसे यांनी गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या बड्या व्यक्तींचा स्पष्टपणे नामोल्लेख टाळला.

दरम्यान, केंद्रातील भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयावर धाड टाकल्यानंतर राज्यात खळबळ माजली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील इतर नेत्यांच्या बाबतीतही तेच घडणार असल्याचे तर्क लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर शिवसेनेने देखील भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली होती. तसेच महाविकास आघाडी सरकारदेखील भाजपच्या नेत्यांचे कनेक्शन शोधून त्यांच्या मागे हात धुवून लागणार याचे संकेत देखील राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून मिळत होते. त्याचा प्रत्यय येण्यास सुरुवात झाली आहे असे म्हणावे लागेल.

कारण भारतीय जनता पक्षाचे सकंटमोचक अशी ओळख असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांचे राईट हॅन्ड समजले जाणारे जळगाव येथील सुनील झंवर (Former Minister Girish Mahajan and Sunil Zanwar connections) या उद्योजकावर BHR सोसायटी प्रकरणात काल (Economic offences wing raids on BHR Society Scam Case) राज्य आर्थिक गुन्हे शाखेने मोठी छापेमारी केल्याचं वृत्त आहे. राज्यातील मोठे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाला काहीदिवसच पूर्ण झालेले असताना महाजनांचे खंदे समर्थक आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले आल्याने भारतीय जनता पक्षाचे देखील धाबे दणाणले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले गिरीश महाजन यांनाच अप्रत्यक्षरित्या कोंडीत पकडण्याची व्यूहरचना असल्याचं समजतं.

धक्कादायक म्हणजे BHR Credit Society’मधील अवसायकाच्या काळातील गैरव्यवहाराच्या गुन्ह्यातील संशयित उद्योजक सुनील झंवर याच्या खान्देश काम्प्लेक्समधील कार्यालयात माजी मंत्री महाजन यांच्या लेटरपॅडसह कागदपत्र सापडल्याचे वृत्त आहे. तसेच याच कार्यालयातून महापालिकेचा स्वच्छतेचा मक्ता असलेल्या वाटरग्रेस कंपनीची कागदपत्रे तसेच मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांची ATM Card मिळाल्याची माहीती आहे. दरम्यान कागदपत्रे सापडली आहेत परंतु, ती कुणाशी संबधित आहे याचा तपास करीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुसरीकडे गुन्ह्याती संशयित सुनिल झंवर, अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह सहा जणांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान या संदर्भात गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता, तो होवू शकला नाही.

 

News English Summary: BHR Society i.e. Bhaichand Hirachand Raisoni Multistate Co-op. According to the documents related to the society, the address of Khandesh Complex in Jalgaon city is Shri. Most of the assets have been purchased by Sai Marketing & Trading Company. The company is owned by Suraj Sunil Zanvar and Kailas Ramprasad Somani, said NCP leader Eknath Khadse. Meanwhile, Suraj’s father Sunil Zanwar’s premises have been raided by the Economic Crimes Branch in connection with the BHR scam. Zanwar is a big businessman in Jalgaon.

News English Title: NCP leader Eknath Khadse produced important papers related BHR Society scam news updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x