21 November 2024 8:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अखेर मोदी सरकार झुकलं | शेतकऱ्यांसोबत आजच बिनशर्त चर्चा

Modi government, call farmers, Farm bill 2020

नवी दिल्ली, १ डिसेंबर: केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आपल्या मागण्यांवर आंदोलक शेतकरी पूर्णपणे ठाम आहेत. दुसरीकडे, बिनशर्त चर्चा करण्यासाठी सरकारनं तयारी दर्शवत अखेर आज शेतकरी संघटनांना चर्चेसाठी पाचारण केलं आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना केंद्र सरकारसशी चर्चेसाठी ३ डिसेंबरची वाट पाहावी लागणार नाही. केंद्र सरकारच्यावतीनं या चर्चेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासोबत इतर काही मंत्री उपस्थित राहू शकतात असं वृत्त आहे.

तत्पूर्वी केंद्र सरकारकडून ३ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, दिल्लीतील कडाक्याची थंडी आणि कोविड संक्रमण (Covid19 crisis) पाहता ही बैठक ३ डिसेंबरऐवजी आजच म्हणजे मंगळवारी होईल, असं शेतकरी संघटनांच्या नेत्यांना दिल्लीतील विज्ञान भवनात दुपारी ३.०० वाजता चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत सहभागी झालेले शेतकरी नेते आज होणाऱ्या दुसऱ्या बैठकीतही सहभागी होणार आहेत.

दरम्यान, कृषी कायद्यावरून (Agriculture Bills) सध्या देशभर वातावरण तापलं आहे. हरयाणा आणि पंजाबमधून होतं असलेला विरोध सध्या देशभर पसरू लागला असून मोदी सरकार देखील पेचात अडकलं आहे. लाखो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन दिल्ली गाठल्याने भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. केंद्राने चर्चेची तयारी दाखवली असली तरी त्यापूर्वी गुंता वाढताना दिसत आहे.

कृषी कायद्यावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा एकदा एका नव्या अडचणीला सामोरं जावं लागतंय. शिरोमणी अकाली दलानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) काढता पाय घेतल्यानंतर आता आणखी एका पक्षानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (BJP) थेट धमकीवजा इशाराच दिला आहे.

आरएलपीचे संस्थापक आणि नागौरचे खासदार असणाऱ्या हनुमान बेनीवाल यांनी सोमवारी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांना टॅग करुन ट्विट केलं. यामध्ये त्यांनी, “अमित शाहजी, देशात सध्या सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवीन कृषी कायद्यांना होणारा विरोध पाहता तिन्ही नवीन कायदे मागे घेण्यात यावेत. स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात. शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या इच्छेनुसार दिल्लीमध्ये चर्चेसाठी आमंत्रित करुन त्यांना योग्य तो मान द्यावा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं” असं म्हटलं आहे.

 

News English Summary: The agitating farmers are fully adamant on their demands against the Central Agriculture Act. On the other hand, the government has shown readiness for an unconditional discussion and has finally called the farmers’ organizations for a discussion today. Therefore, farmers will not have to wait till December 3 for talks with the central government. It is learned that Defense Minister Rajnath Singh, Union Agriculture Minister Narendra Singh Tomar and some other ministers may be present at the discussion on behalf of the Union Government.

News English Title: Ultimately Modi government call farmers for talk today over farm bill 2020 news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x