22 November 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

कुणी कितीही लॉबिंग करा | पहिल्यांदा डॉक्टर आणि पोलिसांना कोरोना लस देणार

First corona vaccine, To Doctors and Police, Health minister Rajesh Tope

मुंबई, १ डिसेंबर: संपूर्ण जग आज कोरोना लस केव्हा उपलब्ध होणार याची वाट पाहत आहे. दुसरीकडे कोरोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. मात्र हे लॉबिंग करणाऱ्यांना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (State health minister Rajesh Tope) यांनी उत्तर दिलं आहे. कुणी कितीही लॉबिंग तरीही डॉक्टर आणि पोलिसांना सर्वात आधी लस देणार (First corona vaccine dose to doctors and Police) असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात सर्वात आधी ज्यांना लस द्यायची आहे त्यांची यादी करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहेआणि या यादीत नाव यावं म्हणून राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी फिल्डिंग लावत आहेत असा देखील आरोप होतो आहे. या सगळ्यावर भाष्य करत राजेश टोपे यांनी सर्वात आधी डॉक्टर आणि पोलिसांना लस देणार असं त्यांनी म्हटलं आहे.

एकाबाजूला कोरोनाचा संसर्ग थैमान घालत असताना दुसरीकडे लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फायजर, मॉडर्ना आणि ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका या कंपन्यांच्या लशींच्या अंतिम टप्प्यातील (final stages of vaccines from Pfizer, Moderna and Oxford-AstraZeneca) प्राथमिक परिणाम सकारात्मक आले आहेत. अमेरिकेत येत्या काही दिवसांमध्ये फायजरची लस देण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. जाहीर झालेल्या परिणामांनुसार , ऑक्सफर्डपेक्षा फायजरची लस प्रभावी आहे. मात्र, भारतात ही लस उपलब्ध होण्याची शक्यता धुसर असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे सिरमच्या कोविशील्डवर (serum corona vaccine CoviShield) सर्वाधिक अपेक्षा असल्याचं वृत्त आहे.

 

News English Summary: The whole world is waiting to see when the corona vaccine will be available today. On the other hand, lobbying is on to get the coronavirus vaccine first. However, the state health minister Rajesh Tope has given an answer to the lobbyists. Health Minister Rajesh Tope has said that no matter how much one lobbies, doctors and police will be vaccinated first.

News English Title: First corona vaccine will get to Doctors and Police said State Health minister Rajesh Tope news updates.

हॅशटॅग्स

#RajeshTope(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x