19 April 2025 5:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

मी जन्माने आणि कर्मानेही हिंदू | सेक्युलर असणं म्हणजे द्वेष करणं नाही

Urmila Matondkar, Hindutva thought

मुंबई, १ डिसेंबर: राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment minister Aditya Thackeray), राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Shivsena Rajysabha MP Priyanka Chaturvedi), महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले.

दरम्यान, पत्रकार परिषदेत उर्मिला यांनी अनेक प्रश्नांवर आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. त्यांना विचारसरणीबद्दल विचारलं असता उर्मिला यांनी आपण जन्माने आणि कर्माने हिंदू असल्याचं ठामपणे सांगितलं. “सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे. हिंदू हा सर्वात सहिष्णू धर्म आहे. मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. मी आजवर हिंदू धर्माचा बराच अभ्यास केला आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून मी योगसाधना केली आहे. देव हा मंदिराच्या गाभाऱ्यात असतो. त्याप्रमाणेच धर्म हा मनातला आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याविषयी जाहीरपणे बोलण्याची मला गरज वाटत नाही. पण मी गरज पडेल तेव्हा धर्मानुसारच वागेन”, असं ठाम मत उर्मिला यांनी व्यक्त केलं.

मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. आज अखेर त्यांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्या कंगनाच्या टीकेला आता यापुढे शिवसेनेतर्फे उत्तर देतील, अशी चर्चा होती. परंतु ‘मी अजिबात कंगनाला उत्तर देणार नाही. याअगोदरच तिच्यावर गरजेपेश्रा जास्त बोललं गेलंय’, असं पक्षप्रवेशानंतर त्यांनी म्हटलंय.

 

News English Summary: Being secular does not mean hating others or one’s own religion. Hinduism is the most tolerant religion. I am a Hindu by birth and by deed. I have studied a lot of Hindu Dharma till date. I have been practicing yoga since the age of eight. God is in the temple. Similarly, religion is a matter of heart and soul. I don’t feel the need to talk about it openly. But when I need to, I will follow my religion, “said Urmila.

News English Title: Urmila Matondkar talked about his Hindutva thought news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या