23 November 2024 1:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

जलयुक्त शिवार योजना | ठाकरे सरकार सूड बुद्धीने चौकशी करतंय

Former minister Ram Shinde, Jalayukta Shivar Yojana inquiry, MahaVikas Aghadi govt

नगर, २ डिसेंबर: “जलयुक्त शिवार योजना ही राज्यातील सर्वाधिक प्रभावी लोकप्रिय ठरलेली योजना आहे. परंतु तरी देखील त्या योजनेची चौकशी करण्यात येत आहे. त्यात मोठ्या प्रमाणात श्रमदान देखील करण्यात आलं होतं. केवळ आकस बुद्धीने किंवा सूड बुद्धीने चौकशी केली जाते आहे,” असा थेट आरोप माजी जलसंधारण मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नेते राम शिंदे यांनी (Former minister Ram Shinde on Jalyukta Shivar Scheme) केला आहे.

तसेच जलयुक्त शिवार योजनेत कॅगने भ्रष्टाचार केला, असे म्हटलेलं नाही. पण खर्च काय झाला याबाबतच्या सूचना दिल्या आहे. या योजनेत स्थानिक पातळीवर पूर्ण सहभाग होता. परंतु राज्यातील महाविकास अगदी सरकारने आकसबुद्धीने ही चौकशी केली. तरी त्यात काही निष्पन्न होणार नाही,” असा ठाम विश्वास देखील राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या वर्षभराच्या कामगिरीबाबत तुम्ही त्यांना किती गुण द्याल? असा सवाल पत्रकारांनी राम शिंदे यांना विचारला. “मी त्यांच्या विरोधात विधासभा निवडणूक लढलो होतो. त्यांनी मला पराभूत करून येथून विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांना गुण किती द्यायचे हे आता मी ठरवणार नाही. येथील जनताच आता त्याचा निर्णय घेईल”, असे मत राम शिंदे यांनी व्यक्त केले. मतदार संघातील विकासकामे आणि एकंदर ठाकरे सरकारची कार्यशैली यावरूनही राम शिंदे यांनी सरकारवर टीका केली.

 

News English Summary: “Jalayukta Shivar Yojana is one of the most effective and popular schemes in the state. But even that plan is still being investigated. It also involved a large amount of labor. The inquiry is being carried out only out of sheer wit or vengeance, ”said Ram Shinde, a former water conservation minister and former MLA Ram Shinde of the Bharatiya Janata Party.

News English Title: Former water conservation minister Ram Shinde reply on Jalayukta Shivar Yojana inquiry news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x