18 April 2025 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | 15 रुपयाचा जेपी पॉवर शेअर खरेदी करा, यापूर्वी 2111% परतावा दिला - NSE: JPPOWER NTPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल 30 टक्के अपसाईड परतावा - NSE: NTPC Rama Steel Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करणार, डिफेन्स क्षेत्रात प्रवेश, फायद्याची अपडेट - NSE: RAMASTEEL IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | 1,988 टक्के परतावा देणारा डिफेन्स कंपनी स्टॉक खरेदी करा, संधी सोडू नका - NSE: APOLLO Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL
x

भाजप IT Cell अध्यक्षांकडून फेक न्युज प्रसार | ट्विटरकडून छेडछाड मीडियाचा शेरा

Twitter flags, BJP IT Cell Head Amit Malviya, Manipulated media Remark

नवी दिल्ली, २ डिसेंबर: भारतीय जनता पक्षाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय (IT cell chief Amit Malviya) यांच्या एका ट्विटवर मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ‘ट्विटर’कडून ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’ (microblogging website Twitter as ‘manipulated media’ remark) अर्थात ‘छेडछाड’ करण्यात आल्याचा शेरा दिसून येतोय आणि त्यामुळे समाज माध्यमांवर भारतीय जनता पक्षाची देखील खिल्ली उडविण्यास सुरुवात झाली आहे. समाज माध्यमांतील अग्रगण्य असलेल्या ‘ट्विटर’नं भारतात ‘फेक न्यूज’ लेबल चिटकवण्यास सुरुवात केल्याचं या घटनेमुळे पहिल्यांदाच जनतेच्या ठळ्ळकपणे लक्षात आलंय, असं म्हणायला हरकत नाही.

भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी २८ नोव्हेंबर रोजी एक फॅक्ट चेक ट्विट पोस्ट केलं होतं. यामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून शेअर केलेला फोटो एका बाजुला तर दुसऱ्या बाजुला याच फोटोशी संबंधित व्हिडिओ मालवीय यांनी स्वतःच्या अकांउंटवरून ट्विट केला होता. राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या फोटोत शेतकरी आंदोलनाशी संबंधित एका वृद्ध शेतकऱ्यावर लाठीचार्ज करणाऱ्या एका हरयाणा पोलिसाची छबी कैद झाली होती. सदर फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाला होता. राहुल गांधी धादांत खोटं बोलत असल्याचं सांगत अमित मालवीय यांनी ‘प्रोपगंडा व्हर्सेस रिअॅलिटी’ असं नाव देत एक व्हिडिओ शेअर केला होता.

तसेच भारताला दीर्घकाळानंतर एक अविश्वसनीय विरोधी नेता मिळाल्याचं’ अमित मालवीय यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसंच पोलिसानं संबंधित शेतकऱ्यावर फक्त काठी उगारली मात्र, ती काठी शेतकऱ्याला स्पर्शून देखील गेली नसल्याचा दावा मालवीय यांनी समाज माध्यमांद्वारे केला होता. मालवीय यांच्या याच ट्विटवर ट्विटरकडून ‘छेडछाड करण्यात आलेली सामग्री’ असा शेरा दिसून येतोय.

दरम्यान, फॅक्ट चेक वेबसाईट असलेल्या ‘अल्ट न्यूज’नं या (Fact Check website Alt News) घटनेचा एक मोठा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यानंतर मालवीय यांच्याकडून अर्धवट सत्य दाखवणारा व्हिडिओ शेअर करून खोटा दावा करण्यासाठी सोशल मीडियावर मोठी टीका होतेय.

 

News English Summary: A tweet by Bharatiya Janata Party’s IT cell chief Amit Malviya has been criticized by microblogging website Twitter as ‘manipulated media’, which has led to ridicule of the Bharatiya Janata Party on social media. It is safe to say that this is the first time that social media pioneer Twitter has started labeling ‘fake news’ in India.

News English Title: Twitter flags BJP IT Cell Head Amit Malviyas tweet as manipulated media news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Malviya(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या