18 January 2025 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना माहित नाही, चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म तिकीट, तात्काळ तिकिटापेक्षाही पडेल तिकीट Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा ITR Filing | या लोकांना पैसे कमावून सुद्धा टॅक्स भरावा लागत नाही, इन्कम टॅक्सही कृपा करतो, फायदा जाणून घ्या Business Idea | स्वतःचा उद्योग सुरु करा रतन टाटा यांच्यासोबत, 40 टक्क्यांपर्यंत मार्जिन मिळेल, महिना लाखोत कमाई होईल
x

गलवान खोऱ्यात भारताविरोधात हिंसाचार हा चीनचा कट | अमेरिकेचा दावा

America disclosure, India China, Ladakh Galvan clash, Chinas planned

वॉशिंग्टन, २ डिसेंबर: चीनचा खरा विघातक चेहरा पुन्हा जगासमोर समोर आला आहे. अमेरिकेने याबाबत खुलासा केल्याने जागतिक स्तरावर खळबळ माजली आहे. भारत चीनच्या सीमेवरील लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचाराचा कट चीनने आखला असल्याचे अमेरिकेच्या संसदीय समितीच्या (US parliamentary committee on Galvan Valley in Ladakh Indo-China border) अहवालात स्पष्ट म्हटले आहे आणि त्यामुळे चीन तोंडघशी पडला आहे.

या हिंसाचाराच्या माध्यमातून चीनला आपल्या शेजारच्या देशाविरोधात बळजबरी करून विस्तारवादी भूमिका आक्रमक करायची होती. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात (Galvan Valley in Ladakh Indo-China border) चीनने भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात तब्बल २० भारतीय जवान शहीद झाले होते. चिनीसैन्याने खिळे लावलेले रॉड त्यावेळी वापरल्याचा यापूर्वीच समोर आलं होतं.

अमेरिकेच्या अहवालात स्पष्टपणे म्हटलं आहे, की गलवानमधील हिंसक चकमक पूर्वनियोजित होती आणि याचे सबळ पुरावे देखील उपलब्ध आहेत. या अहवालात अमेरिकेने म्हटले आहे, की चीनला जमिनीवरच कब्जा करायचा असता, तर त्याने अशा चकमकी ऐवजी थेट लढाईच केली असती. परंतु, गलवान हिंसक चकमकीचे कारण या अहवालात स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र चीनने आपल्या सैन्यासाठी स्ट्रॅटेजिक रूट (China strategic route for its troops) तयार करण्याच्या हेतूने ही चकमक घडवून आणली, असा अंदाज सदर अहवालात लावण्यात आला आहे.

 

News English Summary: China’s true destructive face has once again come to the fore. The US revelation has caused a stir globally. A report by a US parliamentary committee has clearly stated that China was behind the violence in the Galvan Valley in Ladakh on the Indo-China border.

News English Title: America disclosure says India China Ladakh Galvan clash was Chinas planned News updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x