वाजपेयीनीं ३२ पक्षांचा ट्रक ५ वर्षे चालवला | तशी ३ पक्षांची महाविकास आघाडीची रिक्षा पण चालेल
जळगाव, २ डिसेंबर: शरद पवार हे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिताच येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. भारतीय जनता पक्षाला दूर ठेवत शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार आणण्याचा चमत्कार केला. अटलबिहारी वाजपेयी यांनी ३२ पक्षांचा ट्रक ५ वर्षे यशस्वीपणे (Atal Bihari Vajpayee successfully drove a truck of 32 parties for 5 years) चालवला. मग ३ पक्षांची महाविकास आघाडीची (Shivsena, NCP and Congress MahaVikas Aghadi) रिक्षा का चालणार नाही, असे सांगत महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, असा ठाम विश्वास देखील राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी व्यक्त केला.
पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी खडसे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर अनेकांनी मला विचारणा केली की, तुम्ही राष्ट्रवादीचाच पर्याय का निवडला? भारतीय जनता पक्ष मी सोडली नाही, तर मला भारतीय जनता पक्षाने अक्षरशः बाहेर ढकलले.
भारतीय जनता पक्षाने मला पक्ष सोडायला भाग पाडले. अशा परिस्थितीत बहुजन समाजाला खऱ्याअर्थाने न्याय देणारे शरद पवारच आहेत. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मैलाचे दगड ठरतील, असे निर्णय घेतले. माझे पहिले मुख्यमंत्री म्हणून मी नव्वदीच्या दशकामध्ये त्यांच्यासोबत काम केले आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देण्याचे काम शरद पवारांनी केले. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून पवारांनी चांगले निर्णय घेतले. पवारांच्या उत्तम कामगिरीचे अनेक पैलू सांगता येतील, असेही खडसे यावेळी म्हणाले.
News English Summary: The history of Maharashtra cannot be written without mentioning the name of Sharad Pawar, said former minister Eknath Khadse, who joined the NCP, praising NCP president Sharad Pawar. Keeping the Bharatiya Janata Party away, Sharad Pawar performed the miracle of bringing in a government through the Mahavikas Aghadi. Atal Bihari Vajpayee successfully drove a truck of 32 parties for 5 years. NCP leader Eknath Khadse also expressed his firm belief that the Mahavikas Aghadi government will not fall.
News English Title: Mahavikas aghadi government will not fall says NCP leader Eknath Khadse news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार