22 November 2024 1:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

BHR पतसंस्था घोटाळा | माजी नगराध्यक्ष चौकशी फेऱ्यात अडकताच महाजनांचं गुपित फोडलं

Former Minister Girish Mahajan, BHR scam, Paras Lalwani

जळगाव, ३ डिसेंबर: बीएचआर पतसंस्था (BHR Society) अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीशी संबंधित कागदपत्रांनुसार जळगाव शहरातील खान्देश कॉप्लेक्सचा पत्ता असलेल्या श्री. साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ही कंपनी सूरज सुनील झंवर व कैलास रामप्रसाद सोमाणी (Sunil Zanvar and Kailas Ramprasad Somani) यांच्या मालकीची आहे, असे एनसीपीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. दरम्यान, बीएचआर घोटाळा प्रकरणी सूरज यांचे वडील सुनील झंवर यांच्या ठिकाणांवर आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकलेले होते. झंवर हे जळगावातील मोठे व्यावसायिक आहेत.

दरम्यान, राज्यातील बहुचर्चित बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारात एक महत्वाची आणि अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जामनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले (Pune Economic Crimes Branch arrests former Jamner Municipal Corporation mayor Paras Lalvani for questioning) होते. चौकशीनंतर जामनेरात दाखल होताच पारस ललवाणी यांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन गंभीर खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

गिरीश महाजन यांनी बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात थेट लाभार्थी दिसू नये म्हणून कार्यकर्त्यांच्या नावावर मालमत्ता (Property in the name of activists so that Girish Mahajan does not appear to be a direct beneficiary of BHR credit union fraud) घेतल्या. त्यानंतर त्या स्वत:सह पत्नी साधना महाजन यांच्या नावे करून घेतल्या. याबाबत आपल्याकडे ढिगभर पुरावे असून ते पुणे आर्थिक गुन्हे शाखेला दिल्याची माहिती पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यासंदर्भात पुरावे हवे असल्यास काही गट नंबर घेऊन जनतेने ऑनलाइन उतारे तपासून पहावे, त्यात सत्य बाहेर येईल, असे आवाहनही ललवाणी यांनी केले.

बीएचआर पतसंस्था डबघाईस येऊन अवसायनात गेली. त्यावेळी तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी अवसायक म्हणून आपल्या मर्जीतील जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती करवून (The former Minister Girish Mahajan appointed Jitendra Kandare as his successor) घेतली. पाच वर्ष त्यांची बदली होऊ दिली नाही. अवसायक कंडारे यांच्या माध्यमातून लिलावाचा देखावा करून सुनील झंवर यांच्यासह काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या नावे कवडीमोल दराने मालमत्ता घेतल्या. त्यातही मालमत्तांच्या लिलावातून आलेली रक्कम ठेवीदारांना परत करणे अपेक्षित होते. मात्र रक्कम न भरता बहुतांशी ठेवीदारांच्या पावत्या कमिशनवर घेऊन त्यांचा भरणा केला. अशा प्रकारे ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप ललवाणी यांनी केला आहे.

 

News English Summary: The Pune Economic Crimes Branch had arrested former Jamner Municipal Council mayor Paras Lalvani for questioning in a BHR credit union fraud case. As soon as he was admitted to Jamner after interrogation, Paras Lalvani held a press conference to save his own skin and made serious revelations. This time, he has leveled direct allegations against former BJP minister MLA Girish Mahajan. Therefore, BJP leader Girish Mahajan’s troubles are likely to increase tremendously.

News English Title: Former Minister Girish Mahajan involved in BHR scam says Paras Lalwani news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x