21 April 2025 1:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

सरकार पडले की १०५ आमदारांचे १५० आमदार कसे होतील | हे तेव्हा दिसेल - फडणवीस

Opposition leader Devendra Fadnavis, MahaVikas Aghadi government, Thackeray Government

मुंबई, ३ डिसेंबर: महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा भारतीय जनता पक्षाचा कोणताही प्रयत्न नाही. हे सरकार एकदिवस महाआघाडीतील अंतर्गत विरोध आणि वादातूनच कोसळेल. मात्र त्यावेळी भारतीय जनता पक्ष एक मजबूत सरकार देईल. आमच्याकडे सध्या एकूण १०५ आमदार असले तरी त्याचे एकूण १५० आमदार कसे होतात, हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. तेव्हा तशी परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे हे सरकार पडले, की १०५ आमदारांचे १५० आमदार कसे होतील, हे तेव्हा दिसेल’, असे वक्तव्य राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Leader of Opposition in the State Assembly) यांनी केले आहे.

राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्पष्ट मते मांडली. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत (Exclusive Interview to Maharashtra Times) फडणवीस यांनी, महाविकास आघाडीचे सरकार हे ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही, असे भाकीत देखील केले आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे सरकार येईल आणि बहुमताचा १४५ हा आकडा देखील पार केला जाईल, असे भाष्य केले.

सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनीच पुढाकार घेऊन शिवसेनेशी युती केली होती. पण भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार निवडून येऊन देखील सत्तेचे स्वप्न भंगले. युती केल्याचा पश्चाताप होतो का, असे विचारले असता ते म्हणाले, ‘२०१९च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला कौल दिला होता एवढंच ते म्हणाले.

 

News English Summary: The BJP has made no attempt to overthrow the Shiv Sena, NCP and Congress Mahavikas Aghadi governments in Maharashtra. This government will one day collapse from internal opposition and controversy within the Grand Alliance. But then the Bharatiya Janata Party will give a strong government. Although we have a total of 105 MLAs at present, I don’t need to tell you how it gets a total of 150 MLAs. That’s when the situation arises. Therefore, if this government falls, then it will be seen how there will be 150 MLAs out of 105 MLAs, ‘said Devendra Fadnavis, Leader of Opposition in the State Assembly.

News English Title: Opposition leader Devendra Fadnavis takes on MahaVikas Aghadi government news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या