22 November 2024 1:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

कृषी तज्ज्ञ पी. साईनाथ यांनी कृषी कायद्यातील तो धोका सांगितला | का निवडला कोरोना आपत्तीचा काळ..

Delhi farmers protests, P Sainath, Fault in farm law

नवी दिल्ली, ३ डिसेंबर: केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन आता अधिक उग्र स्वरुप धारण करत आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि कृषी तज्ज्ञ पी. साईनाथ यांनीही या कायद्यावर (Senior journalist and agricultural expert P. Sainath) भाष्य केलं आहे. साईनाथ यांनी कृषी कायद्यातील वादग्रस्त क्लॉजवर नेमकं बोट ठेवून हा कायदा शेतकरी विरोधी असल्याचं सांगत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.

“ट्रेड युनियन आणि कर्मचाऱ्यांनी नुकतंच आंदोलन केलं होतं. या आंदोलनातून कृषी कायद्याला विरोध करण्यात आला होता आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यात आला होता. त्यामुळे आता सामान्य लोकांनीही शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्याची गरज आहे,” असं आवाहन साईनाथ यांनी केलं. कोरोना संकटाच्या काळात सरकारने अशा प्रकारचा कायदा आणून चूक केली आहे. सरकारला देशातील वातावरणाचा अंदाज आलेला नाही. कोरोनाच्या काळात हा कायदा लागू केल्यावर कोणीच विरोध करणार नाही, असं सरकारला वाटत होतं. सरकारचा नेमका हाच अंदाज चुकला आणि हजारोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले, असं ते म्हणाले.

या कायद्यातील एपीएमसी अॅक्टच्या क्लॉज 18 आणि 19 मधील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अॅक्टमध्ये अडचणी (Difficulties in the Contract Farming Act in clauses 18 and 19 of the APMC Act) आहेत. या दोन्ही क्लॉजमधून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण देण्यात आलेलं नाही, असं साईनाथ यांनी म्हटलं आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 19मध्ये देशातील लोकांना अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, कृषी कायद्यातील या क्लॉजमधील तरतुदीनुसार या क्लॉजला कोणत्याही प्रकारच्या कायद्याने आव्हान देता येणार (As per the provisions of this clause in the Agriculture Act, this clause cannot be challenged by any law) नाही. शेतकरीच नव्हे तर कोणीही या क्लॉजला आव्हान देवू शकत नसल्याची तरतूद यात करण्यात आली आहे.

दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल (Former Chief Minister of Punjab Prakash Singh Badal) यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ आपला पद्मविभूषण (Return his Padma Vibhushan Award) हा सन्मान परत केला आहे. बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President of India Ramnath Kovind) यांना तीनपानी पत्र लिहून केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध केला आणि शेतकऱ्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत पद्मविभूषण परत केला.

आपला पद्मविभूषण सन्मान परत करताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल (Returning his Padma Vibhushan, former Punjab Chief Minister Parkash Singh Badal said) म्हणाले, ‘मी इतका गरीब आहे की, शेतकऱ्यांसाठी अर्पण करण्याला माझ्याकडे काहीच नाही. मी जो काही आहे तो शेतकऱ्यांमुळेच आहे. अशात जर शेतकऱ्यांचा अपमान होत असेल, तर कोणत्याही प्रकारचा सन्मान राखून ठेवण्यात काहीच फायदा नाही.’ शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे दु:ख झाले आहे. शेतकऱ्यांच्या आदोलनाला ज्या प्रकारे चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात येत आहे ते अतिशय दु:खद असल्याचे बादल यांनी म्हटले आहे.

 

News English Summary: The agitation of farmers in the country against the Central Agricultural Act is now taking a more violent form. Senior journalist and agricultural expert P. Sainath has also commented on this law. Sainath, while pointing a finger at the controversial clause in the Agriculture Act, said that the Act was anti-farmer and appealed to the farmers to support the agitation.

News English Title: Delhi farmers protests P Sainath explains fault in farm law News updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x