22 November 2024 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

या निकालावरून भाजपच्या उद्याच्या, परवाच्या, अनेक वर्षांच्या राजकारणाच्या दाही दिशा स्पष्ट | दरेकरांना टोला

NCP MLA Amol Mitkari, Retweet, BJP Leader Pravin Darekar

पुणे, ४ डिसेंबर: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपुर पदवीधर या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विजय झालेला पाहायला मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने आपणच विजयी होणार असा केलेला दावा फोल ठरलेला दिसत आहे.

यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. पुणे, औरंगाबाद, नागपुर या निकालावरून भारतीय जनता पक्षाच्या उद्याच्या, परवाच्या व अनेक वर्षांच्या राजकारणाच्या दाही दिशा स्पष्ट. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, मुनगंटीवार यांच्या अहंकाराला टाचणी. भ्रमाचा फुगा फुटला. धुळे नंदुरबार पण आयात केलेला निकाल, अशा शब्दांत त्यांनी दरेकर (BJP MLA Pravin Darekar) यांच्या बातमीला रिट्विट करत उत्तर दिले आहे.

दुसरीकडे ‘हिंमत असेल तर एकट्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढा’ असं आव्हान देणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टोला हाणला आहे. ‘चंद्रकांत पाटील यांचा विनोदी विधानं करण्याचा लौकिक आहे. त्यांना यावेळच्या परिस्थितीचा अंदाज होता, म्हणूनच त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्यासाठी सोयीचा मतदारसंघ स्वीकारला,’ असं पवार यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: NCP leader Amol Mitkari has targeted the Bharatiya Janata Party. From the Pune, Aurangabad and Nagpur results, the right direction of the BJP’s future, future and many years of politics is clear. Devendra Fadnavis, Chandrakant Patil, Pravin Darekar, Mungantiwar’s ego. The bubble of illusion burst. Dhule Nandurbar but imported result, in such words he has replied by retweeting Darekar’s news.

News English Title: NCP MLA Amol Mitkari Retweet over BJP Leader Pravin Darekar statement news updates.

 

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x