22 November 2024 8:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

शेतकरी विरोधी कायदे रद्द करा | अन्यथा देशभर मोदींचे पुतळे जाळू | भारत बंदची हाक

Farmers associations, Delhi Protest, Bharat bandh, Farm Bills

नवी दिल्ली, ४ डिसेंबर: मागील तब्बल ९ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. सलग नऊ दिवस झाले तरी केंद्र सरकार कृषी कायदा मागे घेत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येत्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे मोदी सरकार कात्रीत अडकलं आहे. उद्या जर शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्यास मोठ्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येतं नाही.

मागील नऊ दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. पण सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये. केंद्र सरकार आम्हाला कमी लेखत आहे, असा संताप व्यक्त करतानाच केंद्र सरकारच्या या हेकेखोरपणाचा निषेध म्हणून येत्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात येत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

“शेतकरी विरोधी कायदे ५ डिसेंबरपूर्वी रद्द करा नाहीतर देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळले जातील असा इशारा आम्ही सरकारला दिला होता. पण अजूनही सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नाहीय. त्यामुळे आता आम्ही ८ डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा करत आहोत”, असं हरविंदरसिंग लखोवाल म्हणाले. ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.

“केंद्र सरकारला जाचक कृषी कायदे हे मागे घ्यावेच लागतील. आपण आता हे आंदोलन आणखी एक पाऊल पुढे नेत आहोत.”, असं ऑल इंडिया किसान सभेचे सचिव हन्नान मोल्ला म्हणाले.

 

News English Summary: Thousands of farmers have been protesting in the capital for the last nine days. For the ninth day in a row, angry farmers have called for a nationwide shutdown on December 8 as the central government is not repealing the Agriculture Act. Therefore, the Modi government is stuck in a rut. The possibility of major incidents cannot be ruled out if the farmers get angry tomorrow.

News English Title: Farmers associations called Bharat bandh on 8 December against New Farm Bills news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x