बळीराजा संतापलाय | थेट संसदेला घेरण्याच्या इशारा | आज महत्वाची बैठक
नवी दिल्ली, ५ डिसेंबर : केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या 8 दिवसांपासून पंजाब, हरियाणा इथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा 9वा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत आतापर्यंत झालेल्या 4 बैठका निष्फळ झाल्या असून अद्यापही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कृषी बिल रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर केवळ आश्वासन नको ठोस निर्णय घ्या असा शेतकऱ्यांचा सूर आहे.
शेतकरी संघटनांनी केलेल्या मागण्यांवर केंद्र सरकार विचार करत आहे. शनिवारी होणाऱ्या बैठकीत यश नक्की मिळेल. ‘मी शेतकऱ्यायांना हमी देतो की एमएसपीमध्ये कोणताही बदल होणार नाही. संघाची इच्छा असल्यास आम्ही ते लेखी देण्यास तयार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) बळकट करणे देखील आमचे प्राधान्य आहे असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी देखील स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत यशस्वी तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आतापर्यंत चार फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, चारही वेळा चर्चा फिस्कटली. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून, आता संसदेला घेरण्याचा इशारा दिला आहे. कृषी क्षेत्र अधिक खुले करण्याचा दावा करत मोदी सरकारनं तीन कृषी कायदे केले. या कायद्यांना शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होताना दिसत आहे. आधी राज्याराज्यात शेतकऱ्यांनी आंदोलनं सुरू केली. मात्र, सरकारकडून दखल घेतली जात नसल्यानं शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. दिल्लीत आंदोलनासाठी दाखल होण्याआधीच शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आलं. गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत.
Delhi: Farmers continue to hold a sit-in protest at Chilla border (Delhi-Noida Link Road) against the Centre’s #FarmLaws.
A farmer says, “If anything concrete doesn’t happen in today’s meeting with the Central government then we will gherao the Parliament.” pic.twitter.com/4mPOeAm9Xm
— ANI (@ANI) December 5, 2020
News English Summary: Farmers in Punjab and Haryana have been protesting against the three agricultural laws brought by the central government for the last eight days. Today is the 9th day of this movement. Four meetings so far with Union Home Minister Amit Shah and Union Ministers have failed and farmers are still adamant about their role. Farmers are demanding repeal of the agriculture bill. So the farmers are in the mood to take concrete decisions, not just assurances.
News English Title: Farmers Delhi protest considering to reach parliament news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News