मंत्रिपद गेलं तरी चालेल | परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही - विजय वडेट्टीवार
मुंबई, ५ डिसेंबर : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी घटनीपिठाची स्थापना करुन तातडीने सुनावणी करण्याच्या सरकारच्या मागणीला यश आले आहे. राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात ५ सदस्यीय घटनापीठासमोर होणार्या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan, Chairman of the Cabinet Sub-Committee on Maratha Reservation) यांनी आज पाच वकिलांची समन्वय समिती त्यासाठी जाहीर केली आहे. ९ डिसेंबरला ही सुनावणी होणार आहे.
अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समन्वय समितीमध्ये अॅड. आशिष गायकवाड, अॅड. राजेश टेकाळे, अॅड. रमेश दुबे पाटील, अॅड. अनिल गोळेगावकर व अॅड. अभिजीत पाटील यांचा समावेश (Adv. Ashish Gaikwad, Adv. Rajesh Tekale, Adv. Ramesh Dubey Patil, Adv. Anil Golegaonkar and Adv. Including Abhijeet Patil) आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी (To demand revocation of the interim order issued by the Supreme Court regarding Maratha reservation) येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता होणार्या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक व संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा. ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देईल अशी माहिती देण्यात आलेली आहे.
आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय नेत्यांकडून टोकाची विधानं केली जात असल्याचं चित्र आहे. ‘मंत्रिपद गेलं तरी चालेल परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही,’ असं वक्तव्य ओबीसी कार्यकर्ता परिषदेत काँग्रेस नेते आणि महाविकास सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार (MahaVikas Aghadi Government Minister Vijay Wadettiwar on OBC Reservation quota) यांनी केलं आहे.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यात आरक्षणाबाबत नवा पेच निर्माण झाला आहे. अशातच काही मराठा संघटनांनी आमचा समावेश ओबीसींमध्ये करा, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी नेत्यांकडूनही बैठका घेण्यात येत आहेत. त्यातच औरंगाबादमध्ये घेण्यात आलेल्या परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिलासा देत म्हटलं की, ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सर्व नेत्यांचं आश्वासन आहे, मंत्रिपद गेलं तरी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही,’ असं विजय वडेट्टीवार म्हणाले. याबाबत ‘एबीपी माझा’ने वृत्त दिलं आहे.
News English Summary: There is a picture of extreme statements being made by political leaders on the issue of reservation. “Even if the ministry is gone, it will work, but it will not affect the OBC reservation,” said Vijay Wadettiwar, Congress leader and Minister in the Mahavikas government at the OBC workers’ conference.
News English Title: MahaVikas Aghadi minister Vijay Wadettiwar reaction on OBC and Maratha reservation News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल