23 November 2024 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

काँग्रेससोबत तृणमूल काँग्रेस आणि टीआरएस'चा भारत बंदला पाठिंबा | मोदी सरकारची कोंडी

Congress TMC, TRS, support farmers, Bharat Bandh

नवी दिल्ली, ६ डिसेंबर: मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. मात्र तत्पूर्वी म्हणजे ८ डिसेंबरला शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. त्याला राजकीय पक्षांचा जाहीर पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र जगभरातील सर्वच क्षेत्रातील पंजाबी एकवटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

एकामागे घडणाऱ्या घटनांमुळे मोदी सरकारच्या अडचणीत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. ८ डिसेंबरच्या भारत बंदला काँग्रेस पाठोपाठ तृणमूल काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्रा समिती (टीआरएस) या पक्षांनी पाठिंबा जाहीर (Congress, Trinamool Congress and Telangana Rashtra Samiti (TRS) have announced their support for Bharat Bandh on 8 December) केला आहे. त्यामुळे मोदी सरकारसमोर आता मोठी कोंडी निर्माण झाली आहे.

काँग्रेसने अधिकृतरित्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून येत्या ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णयही घेतला आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी ही माहिती दिली. खेडा म्हणाले, “आठ तारखेला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचं समर्थन असेल. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांबाहेरही आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधींनी टाकलेलं हे मजबूत पाऊल असेल. भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होवो यासाठी आम्ही प्रयत्न करु.”

 

News English Summary: One after the other, the difficulties of the Modi government seem to be increasing tremendously. Following the Bharat Bandla Congress on December 8, the Trinamool Congress and the Telangana Rashtra Samiti (TRS) have announced their support. Therefore, a big dilemma has arisen in front of the Modi government.

News English Title: Congress TMC and TRS support farmers Bharat Bandh declared on 8 December against New Agriculture law News updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x