22 November 2024 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मुंबईकरांसाठी | 9 आणि 10 डिसेंबरला शहरातील 'या' भागात पाणीपुरवठा बंद राहणार

Mumbai BMC, water supply, water cut off

मुंबई, ६ डिसेंबर: मुंबई महानगरपालिकेने (Brihan Mumbai Mahanagar Palika) सुमारे चार किलो मीटर लांबीची ब्रिटीशकालीन तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे या कामासाठी येत्या 9 व 10 डिसेंबर रोजी एस विभागातील काही परिसरामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत (Water supply will be cut off in some areas of S section on December 9 and 10 for work) आहे. तर, याच दिवशी के पूर्व, एच पूर्व, एल उत्तर आणि जी उत्तर या विभागांमधये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे या सदर विभागातील नागरिकांना 8 डिसेंबर रोजी पाण्याचा पुरेसा साठा करण्याचे तसेच पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे मुंबई महानगरपालिकेने या भागातील सर्व नागरिकांना केले आहे. (As a result, the Mumbai Municipal Corporation has instructed all the citizens of this area to store enough water on 8th December and to use water sparingly and carefully).

‘एस’ विभाग (S Ward):
डक लाईन, राजाराम वाडी, श्रीराम पाडा, खिंडीपाडा, टेंभीपाडा, सोनापुर, तुलशेतपाडा, प्रताप नगर, जमिल नगर, समर्थ नगर, सुभाष नगर, द्राक्षबाग, उत्कर्ष नगर, राजदीप नगर, लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा नाहूर (पश्चिम) व भांडुप (पश्चिम) परिसर, जयभीम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि लगतचा परिसर, फिल्टर पाडा, आंब्याची भरणी, रावते कंपाऊंड, राम नगर, पासपोली गाव, मोरारजी नगर, गांवदेवी टेकडी, सर्वोदय नगर या परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार.

‘के पूर्व’ विभाग (K East Ward):
चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्र. 1 व 2, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगत सिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक परिसर, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग परिसर, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक परिसर, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, क्रांती नगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत, ओम नगर, क्रांती नगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (तांत्रिक परिसर) सहार गाव, सुतार पाखाडी, विजय नगर मरोळ परिसर, सिप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर या परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

‘एल’ विभाग (L Ward):
कुर्ला उत्तर परिसर, बरेली मस्जिद, 90 फुटी रस्ता, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरी-मरी, घाटकोपर अंधेरी लिंक मार्ग, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, तानाजी नगर, साकी विहार मार्ग, मारवा औद्योगिक मार्गा लगतचा परिसर, सत्य नगर पाईपलाईन या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

‘जी उत्तर’ विभाग (G North):
धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग, प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मिल मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, 90 फूट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग या परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

‘एच पूर्व’विभाग (H East Ward):
वांद्रे टर्मिनल सप्लाय झोन परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा. यामुळे संबंधित नागरिकांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करुन सदर जलवाहिनी बदलविण्याच्या कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.

 

News English Summary: The Brihanmumbai Municipal Corporation has undertaken the task of replacing the four-kilometer-long British-era Tansa aqueduct. It is learned that water supply will be cut off in some areas of S division on December 9 and 10 for this purpose. So, on the same day, low pressure water supply will be provided in K East, H East, L North and G North sections. As a result, the Mumbai Municipal Corporation has instructed all the citizens of this area to store enough water on 8th December and to use water sparingly and carefully.

News English Title: Mumbai BMC water supply will be cut off News updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x