25 November 2024 9:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

मनसे अमराठी लोकांचा द्वेष करतो ही चुकीची समजूत | मनसेची प्रतिक्रिया

MNS Leader Nitin Sardesai, Devendra Fadnavis, Non Marathi issue, MNS party

मुंबई, ७ डिसेंबर: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तृळात सुरु आहेत. यावर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका भारतीय जनता पक्षाला पूरक ठरेल का किंवा त्यांना सोबत घेतल्यास फायदा होईल का? हे आज सांगता येणार नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आमची व्यापक भूमिका आहे. राज ठाकरे यांची मराठी माणसाकरता जी भूमिका आहे ती आम्हाला मान्यच आहे. पण त्याचवेळी आमचं अगदी स्पष्ट मत आहे, मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या हक्काकरता लढलंच पाहिजे. पण त्याच्या हक्काकरता लढणे म्हणजे अमराठी माणसाला वाळीत टाकणे, त्यांच्यावर हल्ले करणं हे आम्हाला मान्य नाही”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना मांडली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे मनसे आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येईल का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं “आमच्यासोबत काही छोटे मित्र आहेत. त्या व्यतिरिक्त कुणासोबत जायचं याबाबत आम्ही निर्णय घेतलेला नाही. त्याबाबत आमची चर्चाही झालेली नाही. हिंदुत्वाचा विचार कुणी मांडत असेल तर त्याचं आकलन निश्चितपणे करता येईल. पण आजतरी आम्ही ते केलेलं नाही. सध्या तरी आमचे जे छोटे मित्र आहेत त्यांच्या भरोशावरच आम्हाला निवडणूक लढवायची आहे”, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

फडणवीसांच्या या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक सूचक वक्तव्य केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठीपणाचा अर्थ हा खूपच व्यापक आहे. महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना त्यांचा हक्क मिळवून देणं हे आमचं प्राथमिक उद्दिष्ट्य आहे. राज्यातील नोकऱ्यांमध्ये मराठी लोकांना प्राधान्य, मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर आणि मराठी संस्कृतीचे पालन असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठीपणाचा अर्थ आहे. मराठीपण बाजूला ठेवण्याचा विषयच उद्धवत नाही. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठीपणाचा व्यापक अर्थ कोणाच्या लक्षात आला नसेल, तर यावर नक्कीच चर्चा केली जाऊ शकते. तसेच अमराठी नागरिकांना मारहाण किंवा तत्सम प्रकाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव घेतलं जात असेल तर हा मुद्दाही चुकीचा आहे. या मुद्द्यावरही चर्चा करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयार आहे”, असं सूचक वक्तव्य नितीन सरदेसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलं.

“अमराठी लोकांचा आमचा पक्ष द्वेष करतो ही चुकीची समजूत आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी लोकांनी मराठी माणसं, मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांचा जर आदर केला, तर त्यांना आमचा विरोध होणार नाही. ते अनादराची वर्तणूक करतात तेव्हा आम्ही विरोधाची भूमिका घेतो. केवळ विरोधाला विरोध किंवा अमराठीला विरोध अशी ठोकळेबाज भूमिका आमच्या पक्षाची नाही”, असे देखील त्यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: It is a misconception that our party hates the Marathi people. If the Marathi people living in Maharashtra respect the Marathi people, the Marathi language and the Marathi culture, they will not oppose us. We take the role of opposition when they behave disrespectfully. It is not our party’s role to just oppose the opposition or oppose the Amharic, “Nitin Sardesai said.
More about it

News English Title: MNS Leader Nitin Sardesai reaction over Devendra Fadnavis talked on Non Marathi issue of MNS party news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x