22 November 2024 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

India Mobile Congress 2020 | मुकेश अंबानी यांची 5G सेवांबाबत मोठी घोषणा

Reliance Jio, Mukesh Ambani, Jio 5G Network, 5G revolution In India

मुंबई, ८ डिसेंबर: संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेलं 5G नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाँच करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यापूर्वीच दिली होती. ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी यांनी यावर भाष्य केलं होते. त्यावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सनं जिओ मीट द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं.

त्यांतर आज रिलायन्स जिओ २०२१ या वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत ५ जी सेवा सुरू करण्याची तयारी करत असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. दरम्यान, यासाठी धोरणात्मक बदल आणि प्रक्रिया वेगवान करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत धोरणात्मक रित्या यात सुलभता आणली जात नाही आणि स्वस्त सेवा दिली जाणार नाही तोवर सर्वांपर्यंत याचा लाभ पोहोचण्याची शक्यता नसल्याचंही ते म्हणाले.

“२०२१ या वर्षात रिलायन्स जिओ देशात 5G ची क्रांती घेऊन येणार आहे. संपूर्ण नेटवर्क हे स्वदेशीच असणार आहे. याव्यतिरिक्त हार्डवेअर आणि तंत्रज्ञानही स्वदेशीच असेल. जिओद्वारे आम्ही आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करणार आहोत,” असंही अंबानी म्हणाले.

‘5G’मुळे दूरसंचार यंत्रणेत दाखल होणारे हे क्रांतिकारी बदल आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान, दळणवळण यांसह दैनंदिन जीवनातील असंख्य घटकांना व्यापून टाकणार आहेत. ३१ जुलै १९९५ रोजी मोबाइलचे तंत्रज्ञान भारतात दाखल झाले. तेव्हा एका मिनिटाच्या कॉलसाठी १६.८० रुपये मोजावे लागत होते. आता व्हॉइस कॉल जवळपास विनामूल्य झाले आहेत. चीनपाठोपाठ सर्वाधिक मोबाइल ग्राहक भारतात आहेत. या लक्षणीय प्रवासाला आज २५ वर्षे पूर्ण होत असून यापुढील दूरसंचार क्षेत्रातील वाटचाल अधिक आश्चर्यकारक असेल, अशी माहिती इंडियन इन्स्टिट्यूट आॅफटेक्नॉलॉजीचे संचालक अभय करंदीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 

News English Summary: Today, Reliance Jio is preparing to launch 5G services in the second half of 2021, said Mukesh Ambani. Meanwhile, this requires strategic change and speeding up the process. He also said that unless it is facilitated strategically and affordable services are provided, it is unlikely to reach everyone. “In the year 2021, Reliance Jio will bring a 5G revolution in the country. The entire network will be indigenous. In addition, the hardware and technology will be indigenous. Through Jio, we will fulfill the dream of a self-reliant India, ”said Mukesh Ambani.

News English Title: Reliance Mukesh Ambani says Jio will Pioneer 5G revolution In India News updates.

हॅशटॅग्स

#Mukesh Ambani(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x