22 November 2024 10:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

राज्यात ६ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा | तरुणांना रक्तदान करण्याचं आवाहन

Health Minister Rajesh Tope, Corona Virus, Limited blood stock, Donate Blood

जालना, 08 डिसेंबर : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लशीबाबत एक गुड न्यूज दिली आहे. कोरोना लशीला अधिकृत परवानगी मिळण्यासाठी सिरम कंपनीने केंद्राकडे परवानगी मागितली, या परवानगीकडे डोळे लागले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.

कोरोना लसीसंदर्भात 5 महत्वाच्या कंपन्या काम करत असून यापैकी 2 शासकीय असून 3 खाजगी आहेत. पुण्यातील सिरम इस्टिट्यूटचे संचालक आदर पुनावाला यांनी ट्वीट करून केंद्र सरकारकडे लसीला अधिकृत करण्यासाठी परवानगी मागितलेली (Adar Punawala, Director, Serum Institute, Pune, tweeted seeking permission from the Central Government to authorize the vaccine.) आहे. सिरमच्या कोरोना लशी संदर्भातील वैद्यकीय चाचण्या संपल्या असून या लसीला आता परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने देखील सिरमच्या 30 ते 35 हजार लोकांवर चाचण्या घेतल्या असून पुण्यातील सिरमने देखील 1 हजार पेक्षा जास्त लोकांवर चाचण्या घेतल्या आहे. त्यामुळे सिरमने लसीला परवानगी मिळण्यासाठी ड्रग अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाकडे दाद मागितली आहे. मात्र त्यांच्या प्रोटोकॉलनुसार या मागणीवर कारवाई करेल असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. राज्यात ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली (Rajesh Tope informed that there is enough blood stock in the state for 5 to 6 days) आहे. तसेच त्यांनी अधिकाधिक तरुणांना पुढे येऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचं आवाहन देखील केलं आहे.

जालना येथे पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी हे आवाहन केलं आहे. राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. एरव्ही तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर रक्तदान करत असतो. परंतु लॉकडाऊनच्या काळात अनेक महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्था बंद होत्या. त्यामुळे रक्तदान शिबिरं झाली नाही. परिणामी रक्तसाठ्यावर परिणाम झाला. आता आपल्याकडे केवळ पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उरला आहेस, असं राजेश टोपे माहिती देताना म्हणाले.

 

News English Summary: State Health Minister Rajesh Tope has given very shocking information. Rajesh Tope has informed that there is enough blood stock in the state for 5 to 6 days. He also appealed to more and more young people to come forward and donate a large amount of blood.

News English Title: Health Minister Rajesh Tope has informed that there is enough blood stock in the state for 5 to 6 days news updates.

हॅशटॅग्स

#RajeshTope(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x