22 November 2024 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

जलयुक्त शिवार फसवी योजना | जादा पाण्याचा दावा खोटा | निकृष्ट दर्जाची कामं

Minister Jayant Patil, Serious allegations, Jalyukt Shivar Yojana, CAG Report

सांगली, १० डिसेंबर: फडणवीस सरकारच्या काळात अनेक योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याची शंका महाविकास आघाडी सरकारला आहे. त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना म्हणावी लागेल आणि विशेष म्हणजे यावर कॅगच्या रिपोर्टमध्ये देखील अनेक नकारात्मक टिपण्या करण्यात आल्या आहेत.

‘जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्रात ७० TMC जादा पाणी साठल्याची फसवी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र तसे काही झालेच नाही. दुष्काळी भागाला या योजनेचा फायदा झाला नाही. उलट निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने पाणी वाहून गेले. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई होणारच,’ असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज सांगितले. ते सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

सांगलीतील पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले, ‘जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात ७० टीएमसी जादा पाणी साठल्याची फसवी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ७० टीएमसी पाणी म्हणजे वारणा धरणाच्या दुपटीपेक्षा जास्त पाणी. ७० टीएमसी जादा पाणी साठवता आले असते तर, दुष्काळी भागाला त्याचा फायदा झाला असता. प्रत्यक्षात मात्र असे काहीच झालेले नाही. उलट निकृष्ट कामांमुळे जलसाठ्यांमधील गळतीचे प्रमाण वाढले. यामुळे पाणी वाहून गेले. याप्रकरणी चौकशी सुरू असून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.’

 

News English Summary: The former Chief Minister Devendra Fadnavis had made a fraudulent announcement that 70 TMC of excess water was stored in Maharashtra due to Jalayukta Shivar Yojana. But that did not happen. Drought areas did not benefit from the scheme. On the contrary, the water was carried away due to poor quality work. The matter will be investigated and appropriate action will be taken against the culprits, ‘said Water Resources Minister Jayant Patil today. He was speaking at a press conference in Sangli.

News English Title: Minister Jayant Patil made serious allegations over Jalyukt Shivar Yojana news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x