20 April 2025 12:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

मी गोमांस खाल्लंय म्हणणारी कंगना म्हणते | मंदिर बांधायला आई दुर्गेने मलाच निवडलं

Actress Kangana Ranaut, Build Durga temple

मनाली, १० डिसेंबर: बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. वादग्रस्त पोस्टच्या माध्यमातून ती बर्‍याचदा चर्चेत राहते. शेतकरी आंदोलनाला विरोध करणारी ट्वीट ती सध्या सातत्याने करत आहे. आता कंगनाने अजून एक ट्वीट करून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधले आहे. यात कंगनाने स्पष्ट केलं की ती एक विशाल मंदिर बांधण्याचा विचार करत आहे. मंदिर बांधण्याच्या कामासाठी आई दुर्गेनेच तिची निवड केली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर लोकांनी बऱ्याच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

माता दुर्गेने मला भव्य मंदिर बनवण्यासाठी निवडले आहे. जे आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी उभारले होते. माता दुर्गा इतकी कृपाळू आहे की, तिने हे घरही स्वीकारले. पण मला एकदिवस असे मंदिर बनवायचे आहे, जी तिची किर्ती आणि आपल्या महान संस्कृतीच्या तोडीचे असेन. जय माता दी, असे ट्विट कंगनाने केले आहे.

कंगनाच्या या पोस्टवर लोकांनी आपल्या प्रतिक्रियाही द्यायला सुरुवात केली. काहींनी तिचं कौतुक केलं तर काहींनी तिच्यावर टीकाही केली. कंगनाची पोस्ट पाहून तिचे कट्टर चाहते म्हणाले की, ‘आम्हाला आमच्या हिमाचलच्या मुलीचा अभिमान आहे. खूप चांगली कल्पना आहे.’ तर अजून एका यूझरने लिहिले की, ‘तुझ्या मनात नक्की काय चाललं आहे हे देवाला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर तुला तिकीट तर मिळणारच नाही.’

विशेष म्हणजे २०१९ मध्ये चित्रपट निर्माता करण जोहरसोबत कंगनाचा वाद विकोपाला गेला होता. आणि आदित्य पंचोली सोबतही वाद तीव्र झाला होता. त्यावेळी समाज माध्यमांवर नेटिझन्सनी कंगनाला मोठ्या प्रमाणावर कंगनाला लक्ष करत प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावेळी एका नेटिझन्सने तिला झोडपताना तिच्या जुन्या मुलाखतीची आठवण करून दिली होत. त्यावर प्रतिउत्तर देताना मी केवळ मांसाहारीच नाही तर गोमांस खाणारी देखील आहे आणि त्यात काहीच चुकीचं नाही असं तिनं ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर बॉलीवूड संबधित पोर्टल्सवर याची जोरदार चर्चा देखील रंगली होती.

 

News English Summary: Maa Durga chose me to build her temple, what our ancestors built for us it is not a patch on their achievements Devi is very kind to accept this humble abode but someday I wish to build a temple that will match up to her glory and our great civilisation. Jai Mata di said Kangana Ranaut.

News English Title: Actress Kangana Ranaut will build Durga temple news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या