23 November 2024 3:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

वणी पालिका भाजपकडे, लोकांची तहान भागवते राज ठाकरेंची मनसे

यवतमाळ : वणी शहराची एक हाती सत्ता भाजपकडे असताना सुद्धा इथे स्थानिकांच्या पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट बनला आहे. सत्ताधारी केवळ टँकर माफियांना पोसण्यातच मग्न असून त्यांचे शहरवासीयांच्या मूळ समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. मे महिन्यामुळे उन्हाची झळ सर्वच घरात पोहोचली असून प्राण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. परंतु इथल्या स्थानिकांची रोजची तहान भागविण्याची जवाबदारी मनसेचे राजू उंबरकर आणि पदाधिकारी नित्याने पेलत आहेत.

शहरात आठ वर्षांपूर्वी भीषण पाणी टंचाई झाली होती. त्या पाणी टंचाईचे मूळ कारण पालिकेचे पाण्यासंबंधित असलेले धोरण हेच जवाबदार होते. शहरात भाजपची एक हाती सत्ता आल्याने अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी नागरिकांची अटकळ होती जी फोल ठरली आहे. कारण पाण्याच्या टंचाईची झळ तीव्र झाल्यावर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. भाजपप्रणीत पालिकेचा हा प्रकार म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदायला घेणे असाच म्हणावा लागेल. त्यांनी केवळ वर्धा नदीचं आता तारणहार आहे असा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला. कारण भुरकी घाटावरून वर्धा नदीच्या पात्रातून शहरात यावर्षी पाणीपुरवठा होणे शक्य नाही. पालिका प्रशासन शहरवासीयांच्या डोळ्यात केवळ धूळपेक करत असल्याचा आरोप शहरवासी करत आहेत.

महत्वाचं म्हणजे पालिकेने सुरु केलेले टँकर नक्की कुठे पाणी पुरवठा करतात तेच कळू शकलेलं नाही. त्यामुळे भाजपप्रणीत पालिका प्रश्नाचे वेगळेच हितसंबंध असावेत अशी कुजबुज शहरात सुरु आहे. शहरात ऐन मे महिन्यात प्रचंड पाणी टंचाई झाली असताना राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरवासीयांसाठी धावून आली असून त्यांनी वणी शहरात मागेल त्याला पाणी हा उपक्रम सुरु केल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणी प्रश्नामुळे आगामी निवडणुकीत सत्ताधारी भाजपला वणी शहरातील नागरिकांनी फटका दिल्यास नवल वाटायला नको. कारण स्थानिकांच्या पाणी प्रश्नावर मनसेचे नेते राजू उंबरकर आणि पदाधिकारी अनेक वर्ष लढा देत असून वेळप्रश्नी स्वतः आर्थिक हातभार लावून लोकांच्या समस्या दूर करण्यावर भर देत आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x