7-12 Utara Pot Hissa | भावकीत भांडणं नको, शेत-जमिनीसाठी पोटहिस्स्यानुसार होणार स्वतंत्र सातबारा, तुम्ही केला का?
7-12 Utara Pot Hissa | ग्रामीण भागात सर्वत्र शेतजमिनीवरून भावकीत नेहमीच तंटे आणि भांडणं पाहायला मिळतात. अनेकांच्या जमिनी याच कारणांमुळे पडीक होऊन राहिल्या आहेत. अनेक एकत्रित कुटुंबात याच कारणामुळे घरातील भांडणं विकोपाला गेल्याच देखील अगदी सहज पाहायला मिळतं. मात्र आता यावर एक आनंदाची बातमी आहे आणि ती देखील सरकारी आणि प्रशासन पातळीवरून. कारण गेल्यावर्षीच ठाकरे सरकारने याबाबत संबधित विभागाला आदेश दिले होते.
शेतजमिनीच्या वादातून होणाऱ्या भांडणाचे कारण ठरणाऱ्या पोटहिस्स्याचेही आता स्वतंत्र सातबारा तयार केले जाणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने (Maha Bhulekh Satbara Utara) यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा अभिलेख हिस्स्याप्रमाणे वेगळे केले जाणार आहेत. तसेच त्यांचे स्वतंत्र नकाशे तयार केले जाणार आहेत. या पद्धतीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारा अभिलेखावर बहीण भावांची तसेच सहहिस्सेदारांची नावे असतात. सातबारावरील नावानुसार प्रत्येकाचा हिस्सा निश्चित असतो. त्यानुसार वाटणी होऊन जमीन ताब्यात जाते. वाटणी झालेल्या जमिनीनुसार वहिवाटही असते. परंतु, अनेकदा सातबारा एकच असल्यामुळे पोटहिस्यावरून भांडणे होतात. असे वाद कोर्टात देखील जातात.
तथापि, पोटहिस्स्याचा स्वतंत्र सातबारा अभिलेख तयार करण्यासाठी भूमी अभिलेख उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने केलेल्या शिफारसीनुसार भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांनी अभिलेख पोटहिस्सा मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांच्या सहकार्याने सभा घेऊन या मोहिमेची माहिती देण्यात येणार आहे. संमतीने पोटहिस्याचा सातबारा स्वतंत्र करायचा असेल, तर त्यासाठी तारीख निश्चित होईल आणि भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी, कर्मचारी गावात येऊन अर्ज स्वीकारतील. आठवडाभरात त्या अर्जांवर कार्यवाही होणार असून, सर्व हिस्सेदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यावर प्रत्येकाचे स्वतंत्र नकाशे करून तहसीलदारांकडे वर्ग करण्यात येणार आहेत.
तहसीलदार सातबारा स्वतंत्र करतील. त्यासाठी नाममात्र 1000 रुपये एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे. मोजणीची आवश्यकता नसल्यास विना मोजणी सातबारा आणि स्वतंत्र नकाशे करून घेता येणार आहेत. या मोहिमेचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार असून, भांडणेदेखील थांबणार आहेत.
News Title: Maharashtra land Satbara utara will get easy for all Bhumilekha news 31 December 2023 updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार