22 November 2024 1:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

आइन्स्टाइन आणि न्यूटनमधील फरक माहिती नसलेल्या मंत्र्यांचा शेतकरी आंदोलनावरून गंभीर आरोप

Farmers protest, Union minister Piyush Goyal, left parties, Kisan Andolan, Farmers Protest

नवी दिल्ली, १२ डिसेंबर: केंद्र सरकारच्या तीन तृषी कायद्याविरोधात (New Agriculture Laws) आंदोलन करणारे शेतकरी (Farmers Protest) आता आपला लढा आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. भारत बंदनंतर आता शेतकरी आंदोलन आणखी पेटणार असल्याचं दिसत आह. कारण मिळालेल्या माहितीनुसार, बलबीर, भारतीय किसान युनियनचे (Bharatiya Kisan Union) अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल (Balbir S Rajewal) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी दिल्ली-जयपूर रस्ता रोखण्यात येणार आहे. इतकंच नाही तर उपजिल्हाधिकारी कार्यालये, भाजपा नेत्यांच्या घरांसमोर निदर्शनंदेखील करण्यात येणार आहे. यावेळी टोल प्लाझादेखील रोखण्यात येईल. यामध्ये केएमएससी नेत्यांच्या अंदाजाप्रमाणे सुमारे 30,000 शेतकरी ट्रॅक-ट्रॉलीसह दाखल होणार आहेत.

दुसरीकडे, कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी पंजाबच्या सात जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजार गावातून 1,500 हून अधिक वाहनं येणार आहेत. त्यापैकी 1,300 ट्रॅक्टर-ट्रॉली दिल्लीकडे येणार आहे. किसान मजदूर संघर्ष समितीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आंदोलकांनी त्यांचा एक नवीन काफिला तयार केला आहे. जो रविवारी दिल्लीच्या सीमेपर्यंत दाखल होणार आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना केंद्रीय रेल्वे मंत्री तसंच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. या आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी नाही तर माओवादी आणि डाव्यांच्या हातात गेल्याचा दावा पीयूष गोयल यांनी केलाय. डावे आपला अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोयल यांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्याला बळी पडून शेतकऱ्यांनी सरकारशी चर्चा करू नये, अशी विनंतीही गोयल यांनी केलीय. ते नवभारत टाईम्स’शी संवाद साधत होते.

आतापर्यंत सरकारकडून आलेले प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळले आहेत. कोरोना असो वा कडाक्याची थंडी, कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय जराही हटणार नाही, असा शेतकऱ्यांनी आज पुन्हा संकल्प केला आहे. भारतीय शेतकरी संघटनेने (भानु) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत सरकारने लादलेले तिन्ही कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे.

 

News English Summary: Union Railway Minister Piyush Goyal and Union Minister for Commerce and Industry made a controversial statement while talking about the farmers’ movement. Piyush Goyal claimed that the leadership of this movement was not in the hands of the farmers but in the hands of the Maoists and the Left. Goyal says that the Left is trying to sell its agenda through this movement. Goyal also urged the farmers not to negotiate with the government. He was talking to Navbharat Times.

News English Title: Farmers protest Union minister Piyush Goyal says left parties are handling Kisan Andolan News updates.

हॅशटॅग्स

#PiyushGoyal(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x