Health First | जेवणातील गोड पदार्थ कधी खावे? | जेवणाच्या सुरवातीला की शेवटी?
मुंबई, १२ डिसेंबर: जेवणात एखादा गोड पदार्थ दिसला की तोंडाला पाणी सुटतं आणि कधी त्यावर एकदाचा ताव मारतोय असं होऊ लागतं. मात्र आयुर्वेदाप्रमाणे जेवणाचे देखील काही नियम असतात जे पलायन आरोग्यावर चांगले आणि फलदायी परिणाम होतात.
पण गोड पदार्थ कधी खावे जेवणाआधी की जेवणानंतर ? आयुर्वेदशास्त्र (Ayurveda) काय सांगते? मधुर रस (Sweet juice) षडरसामधील आद्य रस. सर्वांना आवडणारा, जन्मतःच सात्म्य असणारा. तृप्त करणारा आनंद देणारा रस. But when to eat sweets before or after a meal.
मधुर रस शरीराला का आवश्यक आहे तर त्याचे गुण आचार्यांनी सांगितले आहे की मधुर रस असणारे पदार्थ, घटक द्रव्य शरीराला पुष्ट करणारे, सर्व रसरक्तादि सप्तधातुंना पुष्ट करणारे, वर्ण, केस, ज्ञानेंद्रियांकरीता हितकर, हाडांना जुळवून ठेवणारे, शरीराला स्थिर प्रसन्न जीवन देणारे आहेत. अर्थात नियंत्रणात घेतल्यास. अतिसेवन किंवा नुसते गोडच जास्त खाणे हे स्थूलता मधुमेहसारख्या व्याधींना आमंत्रणच. Overeating or just eating too much sweets is an invitation to diseases like obesity and diabetes.
रोजच्या जेवणात समाविष्ट असलेले तांदूळ गहू दूध, तूप, फळं हे सर्व गोड चवीचेच असतात. डाळी कडधान्य सुद्धा गोड तुरट अशाच असतात. गोड पदार्थ, साखरेचा असो वा गुळाचा पचायला जड असतो. हे लक्षात घेतले पाहिजे. Sweet foods, be it sugar or jaggery, are hard to digest.
जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा पाचकरस आमाशयात स्रवित होतात. जठराग्नि तीव्र झालेली असते. त्यामुळे जे पचायला जड आहे ते आधी खाल्ल्यास लवकर पचतात. पाचन बिघडत नाही. आधी गोड खाल्ल्याने बाकी पदार्थ साहजिकच नियंत्रणात घेता येतील व पोट तडीस लागणार नाही. त्यामुळे जेवणाच्या शेवटी कधीच गोड पदार्थ घेऊ नये. जेवणाच्या सुरवातीला किंवा जास्तीत जास्त जेवणाच्या मधे घ्यावयास हरकत नाही.
आजकाल पाश्चात्त्य अंधानुकरणामुळे आपल्या चांगल्या सवयी तुटत चालल्या आहेत. त्यांच्या वागण्याचा पगडा इतका वाढला आहे की तेच बरोबर असे बिंबवले व नवीन पिढीला शिकविले जातेय. डेझर्ट थंड पदार्थ जेवणाच्या शेवटी घ्यायचे असे पाश्चात्यांनी सांगितले व बिना शास्त्र समजून घेत आपल्याकडे अनुकरण केले जाते.
आपल्या पारंपारीक आहाराच्या सवयींचा अभ्यास केल्यास लक्षात येईल की रोजच्या जेवणात सुद्धा सुरवातीला वरण भात तूप अशी जेवणाची सुरवात करतात. भात हा मधुररसप्रधान असतो. म्हणजेच रोजच्या जेवणाची सुरवात आपोआप गोडानेच होते. इतक्या सहजपणे भारतीय आहारसंस्कृती शास्त्रशुद्ध व आरोग्य परीपूर्ण आहे हे लक्षात येते. याशिवाय आपण गोडाचा पदार्थ करतांना त्यात पाचक मसाल्यांचा देखील संयोग करतो उदा. वेलची, लवंग दालचिनी, जायफळ, केशर हे सुगंधी मसाले स्वाद वाढवितात व पाचन होण्यास मदत करतात. किती आरोग्य टिकविणारी आहार पद्धती आहेत पहा आपली.
मधुररस हा शरीराला आवश्यक आहे हे त्याच्या वर सांगितलेल्या गुणकर्मावरून आपल्या लक्षात आले असेलच. पण या मधुर पदार्थाचे योग्य पाचन होणे गरजेचे. पचलेच नाही, ते शोषणच झाले नाही तर शरीर वर्धनाकरीता त्याचा उपयोग होणार नाही उलट दुष्परीणामच दिसतील. म्हणूनच गोड पदार्थ कधी घ्यावे तर जेवणाच्या सुरवातीलाच. जेवणाच्या शेवटी मुळीच नाही.
News English Summary: If you study your traditional eating habits, you will notice that even in the daily meal, Varan starts with a meal like rice ghee. Rice is a delicacy. This means that the daily meal starts automatically with the knee. It is easy to see that Indian food culture is scientific and healthy. In addition, when we make sweets, we also add digestive spices to it, e.g. Aromatic spices like cardamom, cloves, cinnamon, nutmeg, saffron enhance the taste and help in digestion. See how healthy your diet is. You must have noticed from the above mentioned meritocracy that the body needs sweet juice. But this sweet food needs to be properly digested. If it is not digested, if it is not absorbed, then it will not be used for body augmentation, on the contrary, it will show side effects. So when to eat sweets at the beginning of the meal. Not at the end of the meal at all.
News English Title: Sweets in the meal at the beginning or end health benefits fitness article news.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार