22 November 2024 5:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

TRP scam | रिपब्लिकच्या अडचणीत वाढ | मुंबई पोलिसांकडून सीईओंना अटक

Fake TRP Scam, Republic TV, CEO Vikas Khanchandani, Mumbai Police

मुंबई, १३ डिसेंबर: फेक ‘टीआरपी घोटाळा’ (Republic TV Fake TRP scam) प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत तब्बल 13 जणांना अटक करण्यात आली आहे. Republic TV Fake TRP scam CEO Vikas Khanchandani arrested by Mumbai Police.

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचा टीआरपी घोटाळा उघडकीस आणला होता. बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवले जात होते. याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करून जणांना अटक केली होती. या व्यक्तींच्या चौकशीत आरोपींनी रिपब्लिक चॅनेल पैसे देऊन लोकांना आपलं चॅनेल बघायला भाग पाडत असल्याचं उघडकीस आलं होतं.

बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होते. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली.

नामक काय प्रकरण आहे?
TRP Rating वाढवण्यासाठी संबंधित एजन्सीजना हाताशी धरून कशाप्रकारे एक मोठे रॅकेट कार्यरत होते, याची तपशीलवार माहिती आयुक्तांनी दिली. यात ‘रिपब्लिक टीव्ही’, ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ हे तीन चॅनेल गुंतले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आली होती. मुंबईत बसवण्यात आलेल्या सुमारे २ हजार बॅरोमीटर्सचा वापर टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी केला जात असल्याचेही तपासात आढळले आहे. जे चॅनेल यात गुंतले आहेत त्यांनी आपलाच चॅनेल घरात लावून ठेवावा म्हणून घरोघरी ४०० ते ५०० रुपये वाटल्याचेही पुरावे हाती लागले आहेत. या चॅनेल्ससाठी काही जण काम करत होते. ते दर महिन्याला घरोघरी जात होते व पैसे वाटत होते, असेही स्पष्ट झाले आहे.

 

News English Summary: Vikas Khanchandani, CEO of Republic Channel, has been arrested in connection with the fake TV TRP scam. Mumbai Police has taken this action. As many as 13 people have been arrested so far in the fake TRP scam.

News English Title: Fake TRP Scam Republic TV CEO Vikas Khanchandani arrested by Mumbai Police news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x