22 November 2024 11:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

इथे आणीबाणी, मग थंडीत आंदोलक शेतकऱ्यांवर थंड पाण्याचे फवारे मारणं काय सद्भावनेची गोष्ट?

CM Uddhav Thackeray, Devendra Fadanvis, Undeclared emergency

मुंबई, १३ डिसेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या कामाची माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासह विरोधी पक्षांवर देखील जोरदार निशाणा साधला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “जनतेच्या मताचा विचार केला तर जनतेच्या मनात अशी कोणतीही भावना नाही. जर राज्यात अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? शेतकरी दिल्लीच्या सीमेवर त्यांच्या न्याय हक्कासाठी ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याशी नीट बोलणं, त्यांच्या भावना समजून घेणं या गोष्टी तर सोडाच पण भर थंडीत शेतकऱ्यांना उघड्यावर बसावं लागतंय. त्यांच्यावर थंडगार पाण्याचे फवारे मारले जात आहेत. हे काही सद्भावनेचं लक्षण नाही. जर याची व्याख्याच त्यांना बदलायची असेल तर ते बदलू शकतात.”

करोना काळात महाराष्ट्रात प्रचंड भ्रष्टाचार झाला हा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या आरोपाला उत्तर देत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, करोना काळात जे काही घडलं त्यातून आपण मार्ग काढत आहोत मात्र विरोधकांनी या सगळ्या काळातही फक्त राजकारण केलं. करोनाच्या काळात राज्य सरकारच्या तिजोरीवर भर पडला आहे. अजूनही केंद्राकडून राज्याचे २८ हजार कोटी येणं बाकी आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: Led by Chief Minister Uddhav Thackeray, Deputy Chief Minister Ajit Pawar and Revenue Minister Balasaheb Thorat briefed the media on the work of the government. This time, he also targeted the opposition parties, including the Bharatiya Janata Party. Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis alleged that there was an undeclared state of emergency in Maharashtra. Replying to this, Chief Minister Uddhav Thackeray accused the farmers of trying to crush the agitation. Is there a state of emergency in the country? Presented such a question

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray reply Devendra Fadanvis over undeclared emergency statement News updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x