13 December 2024 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Shakti Act | महाराष्ट्रातील महिला सुरक्षेसाठीचे शक्ती विधेयक विधिमंडळात सादर

Shakti Act, Disha Act, Maharashtra assembly, Home minister Anil Deshmukh

मुंबई, १४ डिसेंबर: राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात महिला सुरक्षा हा चिंताच विषय झाला आहे. आंध्र प्रदेश सरकारने सर्वप्रथम दिशा कायदा कायदा आणून महत्वाचं पाऊल उचललं. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील त्याच दिशने पाऊल टाकत तसाच कायदा राज्यात देखील आणण्यासाठी अभ्यास सुरु केला होता. त्यानिमित्ताने स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्र प्रदेशचा दौरा करून आढावा घेतला होता.

देशभरात कितीही कठोर कायदे आणले तरीही महिला आणि बालकांवरील अत्याचार काही थांबत नाही. त्यामुळे या गुन्हेगारीला समूळ नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हैदराबादच्या दिशा अधिनियमावर शक्ती बिलाचा मसुदा तयार करण्यात आला. हे ‘शक्ती विधेयक’ (Maharashtra State Shakti Bill) आज विधिमंडळात सादर करण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी हे बिल सभागृहात सादर केले असून आता यावर सविस्तर चर्चा करून चर्चेअंती योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे अन्य सभागृहातील अन्य नेत्यांशी विचारविनियम करुन या शक्ती बिलाला मंजूरी देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने दिशा कायदा केला आहे. या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कायदा करण्याच्या दृष्टीने दिशा कायदा समजून घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशला भेट दिली होती. त्या धर्तीवर महाराष्ट्रातील महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार, बलात्कार यांसारख्या गंभीर घटनांना आळा बसावा यासाठी दिशा बिल च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी खास शक्ती विधेयक तयार करण्यात आले.

 

News English Summary: No matter how strict laws are brought across the country, the atrocities against women and children do not stop. Therefore, to eradicate this crime, the Government of Maharashtra drafted the Shakti Bill on the Hyderabad Directions Act. This ‘Shakti Bill’ was introduced in the Legislature today. Home Minister Anil Deshmukh has introduced the bill in the House and it will be discussed in detail and a decision will be taken at the end of the day. Therefore, it is being said that this power bill will be approved after discussions with other leaders in the House.

News English Title: Shakti Act in Maharashtra assembly presented by home minister Anil Deshmukh News updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x