16 April 2025 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL
x

जगभरात Gmail, Google आणि YouTube बऱ्याच वेळानंतर पूर्ववत

YouTube, Google, Gmail, Hangout, workspace services down

वॉशिंग्टन, १४ डिसेंबर: भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल (Gmail) अचानक बंद झाली आहे. ई-मेलसोबतच यू-ट्यूब, गुगल, गुगल ड्रायव्हदेखील डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सला मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोना संकटामुळे अनेक युजर्स वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांना जीमेल, गुगल ड्रायव्ह, यूट्यूब यांची गरज भासते. मात्र, अचानक या सर्व सेवा बंद पडल्यामुळे यूजर्स त्रस्त झाले आहेत. (Gmail and YouTube down in India).

भारतात जीमेल आणि युट्युब सेवा डाऊन झाली आहे. अनेक वापरकर्त्यांना या समस्येला सामोरे जावे लागले आहे. प्रसिद्ध वेबसाईट डाऊन डिक्टेटर, गुगल, युटुयब, जीमेल, गुगल ड्राईव्ह या सेवा वापरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गुगल अनॅलिटिक्स, गुगल स्प्रेडशीट वापरण्यातही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

जर तुम्ही यूट्यूब उघडण्याचा प्रयत्न केला तर यूट्यूब उघडणार नाही. परंतु, जर विना लॉगिन यू्ट्यूब उघडला तर यूट्यूब चांगले काम करीत आहे. त्यामुळे असा संशय व्यक्त केला जात आहे की, गुगल लॉगिन सिस्टम काम करीत नाही. ट्विटर वर याला काही लोकांनी शेयर केले आहे. गुगलची सेवा केवळ भारतात बंद झाली नाही तर संपूर्ण जगभरातून या संबंधीची तक्रार येत आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मध्ये सुद्धा अशीच समस्या येत आहे. याआधी २५ सप्टेंबर रोजी अमेरिकेत जीमेल सह गुगलची काही सेवा बाधित झाली होती.

 

News English Summary: In India, Google’s G-mail service, Gmail, has suddenly shut down. Along with e-mail, YouTube, Google, Google Drive are also down, causing many users to face heartache. In particular, due to the Corona crisis, many users are working from home, so they need Gmail, Google Drive, YouTube. However, the sudden closure of all these services has affected the users.

News English Title: YouTube Gmail Hangout workspace services down in world news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Google(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या