मुंबई काँग्रेस अध्यक्षपद | माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी आणि भाई जगताप यांची नावं चर्चेत
मुंबई, १७ डिसेंबर: मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे आ. भाई जगताप, माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, चरणसिंह सप्रा अशी नावे चर्चेत असल्याचे समजते. काँग्रेस पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील तसेच मुंबईतील पक्ष संघटनेत बदल करण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदासाठी इच्छूकांच्या समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्षपद बदलण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्याची माहिती आहे. विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड (Former MP Eknath Gaikwad) यांच्याविषयी मुंबई काँग्रेस पक्षांतर्गत प्रचंड नाराजी वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसचे खांदेपालट होणार, की गायकवाडांवरील जबाबदारी कायम राहणार, याची उत्सुकता वाढली आहे.
मुंबईतील नेत्यांची दिल्लीत ये-जा वाढली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Minister Aslam Shaikh) काल, तर एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) आज दिल्लीत आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्षपद बदलण्याच्या चर्चांना जोर आला असतानाच या भेटीगाठींना महत्त्व प्राप्त झालं आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना वाढीवर भर दिला आहे. मुंबईत काँग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असला, तरी त्यांच्यापर्यंत संघटनेच्या माध्यमातून जाणे आणि आगामी महापालिका निवडणुकांसाठी पक्षाची तयारी करणे यासाठी विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या जागी नवीन व्यक्तीची नेमणूक व्हावी, असा काहींचा आग्रह आहे.
News English Summary: Congress MLA for the post of President of Mumbai Divisional Congress. It is understood that names like Bhai Jagtap, former health minister Suresh Shetty, Charan Singh Sapra are being discussed. Congress party in-charge H. K. Patil had earlier hinted at making changes in the party organization in the state as well as in Mumbai in view of the forthcoming elections. Against this backdrop, supporters of the aspirants for the Mumbai presidency of the Congress have formed a strong front.
News English Title: Mumbai congress president Suresh Shetty and MLA Bhai Jagtap in competition news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO